IMPIMP

Gulabrao Patil on Raj Thackeray | “ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात, त्या शिवसेनेवर…”; गुलाबराव पाटलांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र !

by nagesh
Gulabrao Patil on Raj Thackeray | Shivsena leader gulabrao patil criticize mns raj thackeray over changing political stands

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Gulabrao Patil on Raj Thackeray | राज्यात मनसे आणि शिवसेना (MNS-Shivsena) आमनेसामने आले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते प्रत्युत्तर देत आहेत. मनसे समर्थकांकडून राज ठाकरे यांचा ‘हिंदूजननायक’ असा उल्लेख करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘हिंदूजननायक’ कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदूजननायक होतो काय ?, राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला. शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष झाले होते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

आता राज ठाकरे यांनी पक्ष बदलला आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही. मात्र ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या माणसाने तीन भूमिका बदलल्या, चौथी भूमिका बदलवणं काय सोपं आहे, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, पक्ष स्थापन करताना वेगळा झेंडा लावायचा, तो झेंडा नंतर बदलला, नंतर भूमिका बदलवली.
मोदींची (PM Modi) प्रशंसा केली, नंतर लाव रे तो व्हिडीओ आणि नंतर पुन्हा मोदीजी.
यानंतर तो भोंगा आणि आता झाला ठेंगा, असंही पाटील म्हणाले.

Web Title :- Gulabrao Patil on Raj Thackeray | Shivsena leader gulabrao patil criticize mns raj thackeray over changing political stands

हे देखील वाचा :

PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार; कुणाला मिळणार नाही लाभ? जाणून घ्या

Pune Metro | महामेट्रोची नवी ‘डेड लाईन’ ! 33.1 किमीचा मार्ग मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणार

Sanjay Raut | महागाईच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची भाजपवर टीका

Related Posts