IMPIMP

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

by nagesh
Gulabrao Patil | gulabrao patil on sanjay raut shivsena politics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनआम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली या गोष्टीचं आम्हाला दु:ख आहे. ही गोष्ट आमच्या मनातही सलत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवले आहे. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात. आमच्या मतांवर खासदार (MP) होतात, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली. ते सोमवारी शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मांडलेला बहुमताचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सभागृहात मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावेळी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केलेल्या आमदारांची बाजू दमदारपणे लावून धरली. अजितदादांना 100 आमदार निवडून आणायचेत, बच्चू कडूंना (Bachchu Kadu) 10 आमदार निवडून आणायचे, मग आमचं काय ? आमचं घर जळतंय, घरातून लोकं पळत आहेत. अजितदादा माझ्याजागी तुम्ही असता तर तुम्हीही उठाव केला असता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आम्ही मातोश्रीवर गेलो. त्यावेळी आम्ही म्हटले की, एकनाथ शिंदेची बाजू ऐकून घ्या. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्हालाही तिकडे जायचे असेल तर जा. आम्हाला गटारातील घाण, डुक्कर म्हटलं गेलं. ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, आम्हाला बोलतात. आम्हाला डुक्कर बोलता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता. हे कोण सहन करणार ? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला.

गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेना सोडून बाहेर पडण्यात केवढा मोठा धोका आहे, आम्हाला ही माहिती आहे.
एकीकडे काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादीसारखे (NCP) विरोधी पक्ष दुसऱ्या बाजूला अडीच वर्षे ज्या भाजपशी (BJP) जमलं नाही ते आहेत.
मात्र आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे फिरले, पण आदित्य ठाकरे…

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) महाराष्ट्रात फिरले नाहीत. आदित्य साहेब मंत्री होते, ते महाराष्ट्रात फिरु शकले असते.
एकदा आदित्य ठाकरेंचे दौरे चेक करा. एकटे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फिरले, जळगावात ते पाचवेळा आले.
शरद पवार (Sharad Pawar) राज्यात फिरतात, अजितदादा (Ajit Pawar) फिरतात.
पण आमचे नेते का नाही आले ? आमचं हे दु:ख सर्वांना समजलं असेल की का गेलो, असे पाटील म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Gulabrao Patil | shivsena rebel mla gulabrao patil slams sanjay raut and aaditya thackeray at maharashtra vidhansabha floor test

हे देखील वाचा :

Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

IMF | आईएमएफने अमेरिकन ग्रोथ रेटचा अंदाज कमी केला, म्हटले – मंदीपासून वाचणे अवघड, काय होणार भारतावर परिणाम ?

Related Posts