IMPIMP

Gulabrao Patil | हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, आदित्य ठाकरे अडीच वर्षात किती जिल्ह्यांमध्ये फिरले?, गुलाबराव पाटील यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

by nagesh
Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन   काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपालांकडे राज्य सरकार (State Government) बरखास्त करण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच विरोधकांकडून राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आज पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केले आहे. आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ इच्छितो की, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरकार बरखास्त करण्याच्या मागण्या करणे हे विरोधकांचे कामच आहे. त्यामुळे ते त्यांचे काम करत आहेत. मी नाना पटोलेंना काही सांगावे, एवढा मोठा माणूस नाही. आमचे सरकार स्थीर आहे. 170 लोकांच्या पाठिंब्याने हे सरकार आले आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहे. त्यामुळे विरोधी पक्ष मधून मधून असे बोलत राहतात. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) गेले अडीच वर्षे किती जिल्ह्यांमध्ये फिरले, त्यांनी किती लोकांच्या भेटी घेतल्या, किती आमदारांना ते भेटले आणि त्यांनी काय कामे केले हे सांगावे, असे देखील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) असंवेदनशील होते. आणि त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच हे शिंदे सरकार (Shinde Government) अस्तित्वात आले आहे. भांडणे ही होत राहतील.
त्यांच्या काळात देखील त्यांच्यात भांडणे होत होती. आमच्यात देखील भांडणे आहेत.
कारण, आम्ही एक कुटुंब आहोत. यावेळी गुलाबराव पाटील मनसेसोबत (MNS) युतीवर देखील बोलले.
मनसेसोबत युतीचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेतील.
ज्यावेळी सर्व नदी आणि नाले एकत्र होतात,
तेव्हा त्याचे पात्र मोठे होत असते. त्यामुळे आम्ही तिघे एकत्र आलो, तर आमचे पात्र मोठे होईल, असेही पाटील म्हणाले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेतली आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात ओला दुष्काळ
(Wet Drought) जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ओला दुष्काळ जाहीर झाला आहे.
पावसाने बाधीत शेतकऱ्यांचे पंचनामे सुरु आहेत.
तसेच आमच्या सरकारने नियमित कर्जधारकांना 50,000 हजार मदत दिली आहे.
आणि त्याचे लाभार्थी नऊ लाख लोक आहेत.
765 कोटी रुपयांचे ओल्या दुष्काळाचे देखील पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केले आहे.
आनंदाचा शिधा देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे, असे गुलाबराव पाटलांनी सांगितले.

गुलाबराव पाटील हे त्यांच्या बहिणीकडे भाऊबीज साजरी करण्यासाठी गेले होते. यावेळी ते माध्यमांसोबत बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Gulabrao Patil | This government is on the side of farmers, how many districts did Aditya Thackeray visit in two and a half years

हे देखील वाचा :

NCP MLA Nilesh Lanke | राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Maharashtra Daura | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा, ठाकरे गटाचे बालेकिल्ले निशाण्यावर

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Related Posts