IMPIMP

Adv Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप; म्हणाल्या – ‘शरद पवार, अजित पवार अन् वळसे-पाटलांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका;’

by nagesh
 Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte wife advocate jayshree patil criticizes on sharad pawar ajit pawar and dilip walse patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Adv Gunaratna Sadavarte | एकीकडे एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) चिघळला असताानाच दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे (MSRTC Workers) वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांना गावदेवी पोलिसांकडून (Gamdevi Police) अटक (Arrested) करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वातावरण तापल्याचं दिसत आहे. कालच एसटी कामगारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केलं. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली गेली. दरम्यान अटकेच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी गंभीर आरोप करत प्रतिक्रिया दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज (शनिवारी) माध्यमांशी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, ”मला माझ्या पतीला भेटू देत नाही. त्यांना अतिरेकी असल्यासारखं घरातून घेऊन आले. कोणतीही माहिती न देता त्यांना अटक करण्यात आली आहे. ही शरद पवार यांचं षडयंत्र आहे. ते ताकदीचा चुकीचा वापर करत आहेत. दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) यांनी हे अटक केलं.” असा आरोप त्यांनी लगावला आहे. (Adv Gunaratna Sadavarte)

पुढे जयश्री पाटील म्हणाल्या, ”इतकंच नाहीतर ‘माझ्या पतीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्यासाठी शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) जबाबदार असतील.
या तिघांकडूनही माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे.” तसेच, ”आम्ही पवार कुटुंबीयांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यामुळे आमच्यावर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय.
मुघलाईसारखं कायद्याला वापरत आहेत.
पण शरद पवार हा टेरर चालणार नाही. तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही, हे मी आधीच सांगितलं होतं.
अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली तशीच पवारांवर होईल,” असा इशारा जयश्री पाटील यांनी दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte wife advocate jayshree patil criticizes on sharad pawar ajit pawar and dilip walse patil

हे देखील वाचा :

Maharashtra Police | पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 29 पोलिसांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

Pune Crime | आत्महत्या करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हडपसरमध्ये कोल्हापूरच्या 22 वर्षीय युवकाविरूध्द FIR

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने गुंडांचा तरुणावर कोयत्याने हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Related Posts