IMPIMP

Har Ghar Tiranga | जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

by nagesh
Har Ghar Tiranga | Inauguration of tiranga flag Sales Center in Zilla Parishad area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Har Ghar Tiranga | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम (Har Ghar Tiranga) 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ यांच्याद्वारे जिल्हा परिषद (Zilla Parishad) आवारात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या हस्ते करण्यात आला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Zilla Parishad CEO Ayush Prasad), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू (Shalini Kadu), उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे (Sachin Ghadge) यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्त (Amrut Mahotsav of Freedom) घरोघरी तिरंगा (Har Ghar Tiranga) फडकवावा यासाठी अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तशी विक्री केंद्रेही विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे वतीने (District Rural Development System) बचतगटातील महिला भगिनींनी ध्वज विक्री उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या केंद्रावरून ध्वज घ्यावा आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.

आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वज विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
ग्रामपंचायत स्तरावरही ग्रामपंचायत तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अंत्योदय तसेच संजय गांधी निराधार योजनेतील (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थ्याला ध्वज मोफत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
गावागावात जनजागृतीही सुरू आहे. ध्वजांची सर्वत्र उपलब्धता असण्यासाठी विविध ठिकाणी केंद्रे सुरू होत आहेत.

जिल्हा परिषदेच्या आवारात शिंदवणे ता. हवेली येथील अन्नपूर्णा महिला ग्राम संघाच्यावतीने ध्वज विक्री सुरू आहे.
सुरुवातीला 1500 ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Har Ghar Tiranga | Inauguration of tiranga flag Sales Center in Zilla Parishad area

हे देखील वाचा :

Soup and Salad | ‘सूप आणि सलाड’चे अशाप्रकारे करू नका सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान

Deepak Kesarkar | राणेंकडून आदित्यची बदनामी, उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

Climbing Stairs | तुम्हाला जिने चढताना धाप लागते का? या पद्धतींनी मिळेल आराम

Related Posts