IMPIMP

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सनं सोडून दिल्यावर हार्दिकनं शेअर केला भावनिक Video

by nagesh
Hardik Pandya | hardik pandya changed the fate of the youth of bihar become a millionaire overnight

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Hardik Pandya | IPL 2022 साठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रिटेन केलेलं नाही. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईने कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) 4 जणांना मुंबई इंडियन्सने रिटेन केले आहे. आयपीएलमधील 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केलं आहे. आता दोन नव्या टीम लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) प्रत्येकी 3-3 खेळाडूंना विकत घेऊ शकते, यानंतर पुढच्या महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने ‘मी या आठवणी आयुष्यभर लक्षात ठेवेन. हे क्षण मी आयुष्यभर स्वत:सोबत घेऊन चालेन. मी जी मैत्री केली आहे, जी नाती तयार केली आहेत, जे लोक आणि प्रशंसक आहेत, मी त्यांचा आभारी आहे. मी फक्त व्यक्ती नाही, तर खेळाडू म्हणून मोठा झालो आहे. मी इकडे युवा म्हणून मोठी स्वप्न घेऊन आलो होतो. आम्ही एकत्र जिंकलो, एकत्र हरलो आणि सोबत भांडलोही,’ असा इमोशनल मेसेज हार्दिकने (Hardik Pandya Instagram Account) व्हिडिओद्वारे पोस्ट केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तसेच मुंबई इंडियन्ससोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे,
या टीमसाठी माझ्या मनात नेहमी खास स्थान असेल असेदेखील हार्दिक पंड्या म्हणाला.
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma),
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि
कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांचा समावेश आहे.
आयपीएल 2022 मध्ये 10 टीम मैदानात उतरणार आहे,
त्यामुळे मॅचची संख्याही 60 वरून 74 होणार आहे. 2022 सालची आयपीएल भारतामध्येच होईल,
असं बीसीसीआयने (BCCI) या अगोदरच स्पष्ट केले आहे.

Web Title :- Hardik Pandya | hardik pandya emotional message after mumbai indians release him for ipl 2022

हे देखील वाचा :

Facial Recognition Technology (FRT) | आता चेहरा दाखवताच तयार होईल Boarding Pass, मार्च 2022 पासून पुण्याच्या लोहगाव विमानतळासह 4 ठिकाणी सुरू होईल FRT System

PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

Kane Williamson | केन विल्यमसनच्या नावावर आणखी एक विक्रम होण्याची शक्यता ! 66 वर्षांनंतर ‘रेकॉर्ड’?

Related Posts