Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांना तुतारीचा मोह ,’रामकृष्ण हरी…आता वाजवा तुतारी’, कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इंदापूर: Harshvardhan Patil | मागील दोन दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बॅनरवॉर रंगले होते. मतदारसंघात महायुतीतल्याच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बॅनर वॉर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूरात “आमचा स्वाभिमान आमचे विमान” “आमचं आता ठरलयं, लागा तयारीला विधानसभा २०२४” अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावले होते. त्यातून पाटील यांनी वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे हे पाहायला मिळालं. (Indapur Assembly)
महायुतीत इंदापूर विधानसभा मतदारसंघातली ही जागा कोणाला जाणार हे गुलदस्त्यात आहे. दरम्यान आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील तुकोबांच्या पालखीत पायी चालत सहभागी झाले होते. हर्षवर्धन पाटील तसे दरवर्षीच वारीमध्ये पायी चालतात. मात्र यंदा हर्षवर्धन पाटलांच्या पायी वारीमध्ये ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले.
पायी चालता चालता हर्षवर्धन पाटलांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला बोलावलं. त्याला तुतारी वाजवायला लावली आणि त्याच्याबरोबर फोटोसेशनही केले. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. ‘रामकृष्ण हरी… आता वाजवा तुतारी’. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यातच हर्षवर्धन पाटील यांना तुतारीसोबत फोटोसेशन करताना पाहून राजकीय वर्तुळात वेगळीच कुजबुज सुरु झाली आहे. (BJP Vs Ajit Pawar NCP)
अजित पवार भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने इंदापूरच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुन्हा इंदापूरच्या जागेवर अजित पवार अडून बसतील आणि सत्ताधारी आमदार म्हणून इंदापूरची जागा दत्तात्रय भरणे यांना सुटेल, असं कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचं विमान आता कुठल्या दिशेनं झेपावणार हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.
Comments are closed.