IMPIMP

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

by nagesh
High Cholesterol | high cholesterol 4 foods could lower bad cholesterol by 40 in few weeks marathi news policenama

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – हाय कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol) लक्षणे शरीरावर ओळखणे अवघड असते. हे हार्ट अटॅक (Heart Attack) आणि स्ट्रोकसारख्या गंभीर (Heart Attack Symptoms) आजारांना प्रोत्साहन देते. हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा उपचार खुप अवघड आहे. परंतु वेळीच डाएटमध्ये बदल (Diet Chart) केल्यास याची जोखीम कमी करता येऊ शकते. एका केस स्टडीनुसार, खाण्याच्या चार वस्तूंच्या कॉम्बिनेशनमुळे काही आठवड्यात कोलेस्ट्रॉल लेव्हल (High Cholesterol) 40 टक्केपर्यंत कमी करता येऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल
हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) रक्तात वसायुक्त अणुंची उपस्थिती दर्शवते. ज्यास प्रोटीन्समध्ये (Protein) विभाजित करता येऊ शकते. लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आणि दुसरे, हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल.

स्टॅनिनचे गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा
हाय कोलेस्ट्रॉलने (High Cholesterol) पीडित लोकांच्या उपचारासाठी नेहमी लिपिड कमी करणार्‍या औषधांचा वापर केला जातो, ज्यास स्टॅनिन म्हटले जाते. मात्र, शरीरावर याचे काही गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.

ओट्स, बदाम, सोया आणि प्लांट स्टेरॉल्स
मागील स्टडीजनुसार, काही गोष्टींचे कॉम्बिनेशन कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यात स्टॅनिनप्रमाणे काम करतात. किंग्ज कॉलेज (लंडन) चे डॉक्टर स्कॉट हार्डिंग यांचा दावा आहे की, ओट्स (oats dry fruits), बदाम, सोया (soya oats) आणि प्लांट स्टेरॉल्स (हिरव्या पालेभाज्या आणि बियांमध्ये आढणारा पदार्थ) शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल सहज कमी करू शकतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

संशोधनासाठी आहारानुसार केले तीन गट
याबाबत चाचणीसाठी हाय कोलेस्ट्रॉलच्या (High Cholesterol) 42 रूग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. सर्व लोकांना तीन गटात विभागण्यात आले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटवर ठेवण्यात आले. पहिल्या ग्रुपला डेली डाएटमध्ये 75 ग्रॅम ओट्स घेण्यास सांगण्यात आले, तर दुसर्‍या ग्रुपला दिवसात 65 ग्रॅम बदाम खाण्यास सांगण्यात आले.

तिसर्‍या ग्रुपला कोलेस्ट्रॉल फूडपासून दूर राहणे आणि जनावरांकडून मिळणार्‍या सॅच्युरेटेड फॅटऐवजी प्लांट बेस्ड फॅट खाण्याचा सल्ला दिला गेला.

कशाप्रकारे कोलेस्ट्रॉल कमी करतात या वस्तू
एक्सपर्टला आढळले की, ओट्स कोलेस्ट्रॉलला आतड्यात पुन्हा शोषित होण्यापासून रोखते आणि हे ब्लड लिपिटसाठी सुद्धा लाभदायक आहे,
तर सोया लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल संश्लेषण रोखते. प्लांट स्टेरॉल्स शरीरात कोलेस्ट्रॉलसोबत लढण्याचे काम करतात.
शेंगभाज्या, व्हेजिटेबल ऑईल, बदाम, धान्य आणि बी प्लांट स्ट्रेरॉल्सचा चांगला स्त्रोत मानले जाते.

LDL कोलेस्ट्रॉलमध्ये 33 टक्के घसरण
या पोर्टफोलिया डाएटच्या चार आठवड्यानंतर डॉक्टरांनी रूग्णांच्या एकुण कोलेस्ट्रॉलमध्ये 25 टक्के
आणि LDL कोलेस्ट्रॉलमध्ये 33 टक्के घसरण आढळून आली.
याशिवाय, केवळ ओट्सचे सेवन करणार्‍या ग्रुपमध्ये 9 टक्के ङऊङ कोलेस्ट्रॉलची घसरण दिसून आली.

तर कोलेस्ट्रॉल वाढवणार्‍या वस्तूंपासून दूर राहणार्‍या ग्रुपच्या ओव्हरऑल कोलेस्ट्रॉल (High Cholesterol ) लेव्हलमध्ये 13 टक्के घसरण नोंदली गेली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- High Cholesterol | high cholesterol 4 foods could lower bad cholesterol by 40 in few weeks marathi news policenama

हे देखील वाचा :

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Satara District Bank Election | सातार्‍यात महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का ! गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा 1 मतानं केला ‘घात’

Related Posts