IMPIMP

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हाकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

by nagesh
High Court | couple elopes to marry in hotel room hc says saat pheras fire lit in utensil is not valid fine

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– High Court | पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (High Court) कठोर अ‍ॅक्शन घेतली आहे. जोडप्याच्या संरक्षण याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्यावर 25 हजार रुपयांचा दंड लावला आहे. जोडप्याने दावा केला की, हॉटेलच्या खोलीत भांड्यात आग पेटवून त्यांनी ’सात फेरे’ घेऊन विवाहाची प्रतिज्ञा घेतली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याचिकेत दावा केला होता की, त्यांचा विवाह झाला आहे. कारण त्यांनी एकमेकांना पुष्पहार घातले आहेत आणि हॉटेलच्या एका खोलीत एका भांड्यात आग पेटवून ’सप्तपदी’ (सातफेरे) केली होती. मात्र कुणी मंत्र म्हटले नाही. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (High Court) म्हटले की हे योग्य नाही. कोणतेही विवाह प्रमाणपत्र जोडलेले नाही, तसेच याचिकेत विवाहाचे छायाचित्र जोडलेले नाही.
हा ‘वैध विवाह सोहळा नव्हता. महिलेचे वय 20 वर्ष आहे, तर मुलाचे वय 19 वर्ष 5 महिने आहे.
दोघांनी आपल्या नातेवाईकांच्या भितीने आपल्या जीवाची सुरक्षा आणि स्वातंत्र्याच्या मागणीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
जोडप्याने 26 सप्टेंबरला हॉटेलच्या खोलीत विवाह केला होता.
त्यांच्याकडे दाखवण्यासाठी कोणतेही विवाह प्रमाणपत्र नाही.
मात्र, न्यायालयाला आढळले की, मुलाचे वय विवाहासाठी पात्र नव्हते.
दाम्पत्य न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते की, त्यांनी विवाह केला आहे.
न्यायालयाने पंचकुला पोलीस आयुक्तांना दाम्पत्याला सुरक्षा प्रदान करण्याचा आदेश दिला, कारण त्यांच्या जीवाला आणि स्वातंत्र्याला धोका आहे.

Web Title : High Court | couple elopes to marry in hotel room hc says saat pheras fire lit in utensil is not valid fine

हे देखील वाचा :

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

Pune Crime | गजा मारणेच्या 4 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,616 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts