IMPIMP

Hingoli Crime | 13 वर्षाच्या मुलीला पळवून नेत केला अत्याचार, आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

by nagesh
Pune Crime | Bail granted to the accused who suffocated the tempo driver for not waiting for the car

हिंगोली : सरकारसत्ता ऑनलाइन13 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात (Hingoli Crime) घडली होती. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) करुन न्यायालयात (court) दोषारोपपत्र (Charge sheet) सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.व्ही बुलबुले (District and Sessions Judge P.V. Bubble) यांच्या न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा (Hingoli Crime) सुनावली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कळमनुरी येथील पंचशीलनगर भागात राहणाऱ्या इयत्ता 8 वी मधील एका 13 वर्षाच्या मुलीला अण्णाभाऊ साठेनगर भागात राहणाऱ्या अमोल जयराम लांगडे (Amol Jayaram Langade) याने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार 24 ऑक्टोबर 2019 रोजी कळमनुरी पोलीस ठाण्यात (Kalmuri Police Station) दाखल करण्यात आली होती. यावरुन पॉक्सोसह (Pocso Act) विविध कलमान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे (PSI Pratibha Shete) यांच्या पथकाने तपास करुन हिंगोलीच्या (Hingoli Crime) न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

यामध्ये सरकारी वकील एन.एस. मुटकुळे (Public Prosecutor N.S. Mutkule) यांनी 14 साक्षीदार तपासले. यात पीडित मुलीची आजी फिर्यादी होती. तिच्यासह पीडिता व इतर साक्षीदारांचा पुरावा (Evidence of Witnesses) ग्राह्य धरण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.व्ही बुलबुले यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून आरोपी अमोल लांडगे याला पॉक्सोअंतर्गत दोषी ठरवून 10 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने कारावास, कलम 376 (2) (आय) व (एन) या दोन्ही कलमांतही हीच शिक्षा सुनावली. तर क. 366आ आणि 363 नुसार 7 वर्षे कारावास व 1 हजार दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी वकील अ‍ॅड. एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. एस.टी. कुटे (Adv. S.T. Kute), अ‍ॅड. एस.एस. देशमुख (Adv. S.S. Deshmukh) यांनी सहकार्य केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भोईटे (Police Inspector Bhoite) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोयलावार (API Royalawar), तक्कालीन राईटर पोलीस उपनिरीक्षक पठाण, पोलीस नाईक संदीप पवार यांनी केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Hingoli Crime | 13-year-old girl abducted, tortured, accused sentenced to 10 years hard labor

हे देखील वाचा :

Pune Lohegaon Airport | कोरोनाची संख्या वाढली, प्रवासी संख्या घटली ! पुण्यातील दररोज उड्डाण होणारे 20 ते 25 विमाने रद्द

Kirit Somaiya | ‘रश्मी ठाकरेंना राबडी देवी म्हणणाऱ्यांना लगेच जेलमध्ये टाकलं, मग नाना पटोलेंवर कारवाई का नाही?’

Urfi Javed Braless | उर्फी जावेदच्या ब्रालेस लुकने इंटरनेटवर लावली आग, चाहते म्हणाले…

Related Posts