IMPIMP

Home Remedies for Chest Gas | छातीतून गॅस काढण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

by nagesh
Home Remedies for Chest Gas | ways to get rid of chest gas in marathi

सरकारसत्ता ऑनलाइन –  Home Remedies for Chest Gas | गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता (Gas, Indigestion, Constipation) ही समस्या आजकाल सामान्य झाली आहे. आजकाल बहुतेक लोक गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत. गॅस तयार झाल्यामुळे पोटदुखी, पोटात जळजळ इत्यादी एक-दोन समस्यांना सामोरे जावे लागते. पण कधी कधी हा गॅस डोक्यात किंवा छातीपर्यंत पोहोचतो आणि अडकतो. या प्रकरणात, तुम्हाला छातीत किंवा डोक्यातही वेदना जाणवू शकतात. छातीत तयार झालेला गॅस दूर करण्याचे काही उपाय जाणून घेवूयात. (Home Remedies for Chest Gas)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. ओवा (Ajwain)
छातीत गॅसमुळे जळजळ होत असेल किंवा दुखत असेल तर ओवा पावडर, चहा किंवा काढा प्रभावी ठरू शकते.

2. बडीशेप (Fennel)
छाती आणि पोटातील वायू सहज दूर करण्यासाठी बडीशेप पाणी, चहा आणि काढा बनवून पिऊ शकता. तसेच बडीशेप चघळूनही खाता येते.

3. आले (ginger)
आल्याचे सेवन चहा, काढा इत्यादी स्वरूपात करा. आले भाज्या किंवा डाळीमध्ये मिसळूनही खाऊ शकता.

4. लिंबूपाणी (Lemon water)
छातीत गॅस अडकला असेल तर एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात लिंबू पिळून काळे मीठ टाकून प्या. गरम पाण्यात लिंबू मिसळून प्या. (Home Remedies for Chest Gas)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

5. वेलची (Cardamom )
छातीत किंवा पोटात गॅस निर्माण झाल्यास वेलचीचे पाणी प्या. एक ग्लास पाण्यात वेलची उकळा आणि हे पाणी गाळून प्या. खूप आराम मिळेल.

छातीतही गॅस अडकल्याने जळजळ आणि वेदना होत असतील तर लिंबूपाणी, ओवा, आले, वेलची आणि बडीशेप यांचे सेवन करू शकता. गॅसची समस्या दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Home Remedies for Chest Gas | ways to get rid of chest gas in marathi

हे देखील वाचा :

Weird Food Combinations | पपई खाल्ल्यानंतर कधीही खाऊ नका या वस्तू, होऊ शकते जीवघेणे नुकसान

Maharashtra Cabinet Expansion | अखेर महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, दीपक केसरकरांनी दिले स्पष्ट संकेत

Ginger Milk Benefits | रोज आले टाकून करा दूधाचे सेवन, मान्सूनमध्ये होणार नाहीत या 3 आरोग्य समस्या

Related Posts