IMPIMP

IAS Manisha Patankar-Mhaiskar | ट्रेकिंगसाठी गेलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्यावर मधमाशांचा हल्ला

by nagesh
IAS Manisha Patankar-Mhaiskar | bee attack on ias officer manisha patankar mhaiskar while went for trekking

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन IAS Manisha Patankar-Mhaiskar | महिला आयएएस अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर (IAS Manisha Patankar-Mhaiskar) यांच्यावर मधमाशांनी हल्ला (Bee attack) केला आहे. पहाटेच्या सुमारास गिर्यारोहकाबरोबर ट्रेकिंगसाठी गेले असता अचानक त्यांच्यावर आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या साथीदारांवर मधमाशांनी हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या समवेत असणारे गिर्यारोहक मिलिंद (Climber Milind) यांना मधमाशांनी अधिक हल्ला केला आहे. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

1992 बॅचच्या असणाऱ्या सनदी अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर (IAS Manisha Patankar-Mhaiskar) यांनीच फेसबुक पोस्टमधून हा भयावह अनुभव सांगितला आहे. मनीषा पाटणकर-म्हैसकर या सध्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, महिला अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर या काल आपल्या काही साथीदारांसोबत ट्रेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळी गिर्यारोहक मिलिंद हा सगळ्यात पुढे चालत होते, तर पाटणकर-म्हैसकर या मिलिंद यांच्या मागे काही अंतरावरुन येत होत्या. अचानक मिलिंद मागे वळाले आणि त्यांनी ओरडत मनीषा यांना पळण्यास सांगितलं. मिलिंदवर मधमाशांनी जोरदार हल्ला (Bee attack) केला. यावेळी अधिकारी मनीषा यांनी आपल्याकडील स्टोल मिलिंदच्या दिशेने फेकला. मिलिद स्टोल पांघरून खाली बसला. पण भरगच्च माश्यांनी मिलिंदला कवटाळले होते. काही माश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

दरम्यान, तेथील काही माशा मनीषा पाटणकर-म्हैसकर (IAS Manisha Patankar-Mhaiskar) यांच्याकडे हल्ला करण्यासाठी भिरकल्या.
तितक्यात तेथील स्थानिक नागरीकांनी संयम राखत त्यांच्याजवळील कोट आणि शॉल मनीषा यांना दिले.
यामुळे मनीषा या मधमाशांच्या तावडीतून थोडक्यात बचावल्या आहेत.
या दरम्यान, येथील काही स्थानिकांनी धूर करून मधमाशांना पळवून घालवलं आहे.
मात्र, गिर्यारोहक मिलिंद याला अनेक मधमाशांनी अटॅक केलं आहे. नंतर मधमाशांनी केलेल्या दंशचे काटे काढण्यात आलेत.
तर त्यांची तब्येत स्थिर असून औषधोपचार घेतला आहे.

Web Title :- IAS Manisha Patankar-Mhaiskar | bee attack on ias officer manisha patankar mhaiskar while went for trekking

हे देखील वाचा :

Ration Card | सरकारी दुकानांतून अपात्र लोकसुद्धा घेताहेत रेशन, नियमात होणार बदल; जाणून घ्या सविस्तर

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघात 3 ठार तर 6 जण जखमी; सहा वाहने एकमेकांवर आदळली

Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘काम’ देण्याच्या आमिषाने पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेवर वेळावेळी ‘लैंगिक’ अत्याचार, महिलेसह पतीला जीवे मारण्याची धमकी

Related Posts