IMPIMP

Imli Serial Fame Hetal Yadav | ‘इमली’ फेम हेतल यादव यांचा भीषण अपघात

by nagesh
Imli Serial Fame Hetal Yadav | imli serial fame hetal yadav had an accident while returning home from shooting

बहुजननामा ऑनलाईन टीम : Imli Serial Fame Hetal Yadav | ‘इमली’ फेम अभिनेत्री हेतल यादव यांचा नुकताच गंभीर अपघात झाला आहे.
रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. मात्र,
हेतल यादव या अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत. (Imli Serial Fame Hetal Yadav)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हेतल यादव या आपले शूटिंग संपवून घरी परतत होत्या. यावेळी स्वतः गाडी चालवत होत्या. त्यावेळी अचानक मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यावेळी हेतल यादव या अपघाताबद्दल म्हणाल्या की, “रात्री पावणे नऊ वाजता माझं शूटिंग संपलं आणि मी फिल्मसिटीहून घराकडे निघाले. मी JVLR महामार्गावर पोहोचताच एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली आणि माझी गाडी एका बाजूला ढकलली गेली.” आणि हा भीषण अपघात झाला. सुदैवाने मला दुखापत झाली नाही, पण अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर आलेले नाही,” असेदेखील त्या म्हणाल्या.

हेतल गेल्या 25 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘ज्वाला’ची भूमिका साकारत त्यांनी
लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.
तर आता त्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत शिवानी राणाची भूमिका साकारत आहेत.
त्यांच्या या भूमिकेचेदेखील सर्वत्र कौतुक होत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Imli Serial Fame Hetal Yadav | imli serial fame hetal yadav had an accident while returning home from shooting

हे देखील वाचा :

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून मंगळवार पेठेत तरूणीचा विनयभंग

Pune PMPML Bus | ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

Nick Bollettieri Death | दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन; सेरेना, विनस विल्यम्स, मारिया शारापोवा आणि आंद्रे अगासीला दिलं होतं प्रशिक्षण

PAK vs ENG Test Match | रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवत केले ‘हे’ 4 वर्ल्ड रेकॉर्ड

Related Posts