IMPIMP

COEP | गरजु विद्यार्थ्यांसाठी अवघ्या दोन तासांत तब्बल 12 लाख रुपयांचा निधी जमा; सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशन तर्फे सुरु केलेल्या ‘स्टुडंट सपोर्ट क्लब’ उपक्रमास भरघोस प्रतिसाद

by bali123
In just two hours, a fund of Rs. 12 lakh Great response to the ‘Student Support Club’ initiative launched by the COEP Alumni Association

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनCOEP | कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (College of Engineering Pune) (सीओईपी) मधील कोणताही विद्यार्थी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून, अन्नापासून, शिक्षण साहित्यापासून वंचित राहू नये म्हणून सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशनच्या (Alumni Association) वतीने गरजु विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट सपोर्ट क्लब’ (Student Support Club) या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशन आणि सीओईपी (COEP) सीएक्सओ क्लबतर्फे आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ वितरण सोहळ्यात या अभिनव उपक्रमाची घोषणा करण्यात आली. ऑनलाईन झालेल्या दोन तासाच्या या कार्यक्रमात या उपक्रमासाठी तब्बल 12 लाख रुपयांचा निधी जमा झाला. आणि माजी विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास आता मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशन (COEP Alumni Association) तर्फे 2019-20 आणि 2020-21 या वर्षासाठीच्या ‘सीओईपी अभिमान पुरस्कारा’चे ऑनलाईन कार्यक्रमात वितरण झाले. भारतीय नौदलातील रिअर अ‍ॅल्युमनी आशिष कुलकर्णी (1987 बॅच), महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे (1989 बॅच), अ‍ॅम्फोनल इंडियाचे संचालक रॉबर्ट जॉन (1980 बॅच), आयएसबी हैदराबादचे उपअधिष्ठाता मिलिंद सोहोनी (1990 बॅच), अमेरिकेतील एमआयटी मधील सहाय्यक प्राध्यापक रमेश रासकर (1991 बॅच) यांना 2020-21 वर्षाच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, 2019-20 साठी भारतातील पहिल्या शेल मोल्डिंग मशिनचे डिझाईनर एच ई गोडबोले (1965 बॅच), पुणे मेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये (1971 बॅच), प्राप्ती कर खात्याचे अतिरिक्त संचालक संदीपकुमार साळुंखे (1998 बॅच) आणि जिओसॅटचे प्रोग्रॅम संचालक पद्मश्री व्ही आर कट्टी (1969 बॅच) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी कोरोनामुळे पुरस्काराचे वितरण झाले नसल्याने आणि यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन्ही वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा एकत्रितच ऑनलाईन पद्धतीने पार पडला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रसंगी सीओईपीचे 1995 च्या बॅचचे विद्यार्थी आणि प्रसिद्ध लेखक, जीवनशैलीचे मार्गदर्शक गौर गोपाल दास यांनी जीवनातील आनंद, नाती आणि जीवनाचा हेतू याविषयी मार्गदर्शन केले. या सन्मान सोहळ्यास सीओईपीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक डॉ. बी. बी. अहुजा, सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष भरत गिते, सचिव डॉ. सुजित परदेशी, खजिनदार अंकिता चोरडिया, सदस्य एस पी महाजन, स्वीकृत सदस्य मोहित गुंदेचा व अनुप साबळे आदी मान्यवर आणि एक हजारांहून अधिक माजी विद्यार्थी देश-विदेशातून उपस्थित होते.

यावेळी सीओईपीच्या वाटचालीबद्दल आणि व्हिजनबद्दल प्रतापराव पवार यांनी माहिती दिली. डॉ. बी बी अहुजा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. डी. आगाशे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरुची वाघ यांनी केले.

Web Title : In just two hours, a fund of Rs. 12 lakh Great response to the ‘Student Support Club’ initiative launched by the COEP Alumni Association

Related Posts