IMPIMP

Income Tax Department Raid | 120 तासांनी संपली कारवाई तब्बल 257 कोटींचं सापडलं घबाड; 50 तासांच्या चौकशीनंतर कानपुरातील व्यापार्‍याला अटक

by nagesh
Income Tax Department Raid | piyush jain kanpur raid 257 crore cash dubai property documents seized in 120 hour long raid

कानपूर : वृत्तसंस्था कानपूर येथे प्राप्तिकर विभागानं मोठी कारवाई (Income Tax Department Raid) केली असल्याची माहिती समोर आली आहे. येथील अत्तर व्यावसायिक पियूष जैन (Piyush Jain) यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागानं केलेल्या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आढळून आलै. या छापेमारीत तब्बल 257 कोटींचं घबाड सापडलं आहे. तसेच एकूण 16 संपत्तींची माहिती मिळाली आहे. तर, काही कागदपत्रे सापडली आहेत. यानुसार त्यांच्याकडे 16 महागड्या संपत्ती आहे. यामधील 4 कानपूर, 7 कनौज, 2 मुंबई आणि 1 दिल्लीत आहे. खरंतर 2 संपत्ती दुबईत असल्याची माहिती मिळते. या मोठ्या कारवाईमुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे.. (Income Tax Department Raid)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

पियूष जैन हे कानपुरात अत्तराचा व्यवसाय करत होते. त्यांची कनौज, कानपूर आणि मुंबईत कार्यालयात आहेत. कानपूरमधील धाडीदरम्यान प्राप्तिकर विभागाला (Income Tax Department) 40 कंपन्यांचीही माहिती मिळाली. ज्यांच्या आधारे ते आपला व्यवसाय चालवत होते. तर पथकाने टाकलेली ही कारवाई तब्बल 120 तासांनी संपली आहे. यामध्ये रोख रक्कम आणि संपत्तीच्या कागदपत्रांसोबतच काही किलो सोने देखील पियूष जैन यांच्या घरातून जप्त केले गेले आहे.

मागील आठवड्यात प्राप्तिकर विभाग (Income Tax Department Raid) आणि जीएसटीच्या (GST) अधिकाऱ्यांनी पियूष जैन (Piyush Jain) यांच्या कानपूरमधील निवासस्थानी छापेमारी करत 257 कोटींची रोख रक्कम जप्त केली होती.
तसेच, पियूष जैन यांच्या कनौज येथील पूर्वजांच्या घरात 18 लॉकर्स सापडले आहेत.
यावेळी पोलिसांना 500 चाव्यांचा गठ्ठा सापडला आहे.
तर आता पियूष यांना करचुकवेगिरी केल्याप्रकरणी 50 तासांच्या चौकशीनंतर अटक (Arrested) केली गेली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

दरम्यान, जेव्हा अधिकारी कारवाई करण्यासाठी आले तेव्हा पियूष जैन दिल्लीत होते.
“वडिलांवरील उपचारासाठी कुटुंब दिल्लीत गेलं होतं. त्यांची 2 मुलं फक्त घरात होती,
तर, तपास अधिकाऱ्यांनी फोन केल्यानंतर पियूष जैन घरी परतले अशी माहिती पियूष जैन यांच्या
घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने 22 डिसेंबरला एका वृत्ताला दिली होती.

Web Title :- Income Tax Department Raid | piyush jain kanpur raid 257 crore cash dubai property documents seized in 120 hour long raid

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | पडळकरांच्या सुरक्षेसाठी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का?’

Happy Birthday Salman Khan | वाढदिवसादिवशी सलमान खानने केली मोठी घोषणा, ‘भाईजान 2’चा खुलासा

Pune Crime | पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, हडपसरच्या सातववाडी येथील घटना; दोघांविरूध्द गुन्हा

Related Posts