IMPIMP

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

by nagesh
ITR Filing Verification | itr filing verification here is six ways you can verify your income tax return

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Return | केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) मंगळवारी मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तीकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2022 पर्यंत वाढवली, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात देण्यात आली आहे. आयटीआरची मुदत वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. (Income Tax Return)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यापूर्वीची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. त्यानंतर आता तारीख वाढवली जाणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी सांगितले होते की प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर लेखापरीक्षण अहवाल आणि ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की कोविड आणि विविध ऑडिट अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरताना करदाते आणि इतर संबंधित पक्षांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, 2020-21 (आकलन वर्ष 2021-22) या आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर विवरणे आणि विविध ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुळात कंपन्यांसाठी प्राप्तीकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर होती. ’ट्रान्सफर प्रायसिंग’ डीलसाठी अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. नंतर ही तारीख पुन्हा वाढवण्यात आली.

यापूर्वी स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिटर्न भरण्याची तारीख न वाढवण्याची घोषणा केली होती. शेवटची तारीख न वाढवण्याच्या घोषणेनंतर खळबळ उडाली होती.

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली जाणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते.
आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 हीच राहील याची करदात्यांनी नोंद घ्यावी.

याबाबत महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले होते की, प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अधिकृत अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे.
ते म्हणाले की, आत्तापर्यंत दाखल केलेले रिटर्न गेल्या वर्षी भरलेल्या रिटर्नपेक्षा जास्त आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ज्या करदात्यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे ITR ई-सत्यापित केले नाही
ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सत्यापन प्रक्रिया पूर्ण करू शकतात, कारण प्राप्तीकर विभागाने करदात्यांना एक वेळची सूट दिली आहे.

कायद्यानुसार, डिजिटल स्वाक्षरीशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरलेला ITR आधार OTP, किंवा नेट बँकिंग,
किंवा डीमॅट खाते, पूर्व-प्रमाणित बँक खाते आणि ओटीपीद्वारे पाठवलेला कोड,
रिटर्न भरल्यापासून 120 दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाऊ शकते.

पडताळणी करणे आवश्यक आहे. हे शक्य नसल्यास,
दाखल केलेल्या ITR ची हार्डकॉपी बेंगळुरू येथील सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर कार्यालयात पाठवावी लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Income Tax Return | deadline for filing it returns extended to march 15 extended for third time said earlier date will not extend beyond this

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात बुली बाईसारखा प्रकार? ओळखीच्या मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहर्‍यावर लावून बनवले अश्लिल फोटो अन्…

Ring Road in Pune | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर

Paytm Share Price | सतत घसरतोय पेटीएमचे शेयर, का खाली जाताहेत ‘हे’ स्टॉक, गुंतवणुकदारांनी आता काय करावे

Related Posts