IMPIMP

Income Tax Return | इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना Tax वाचवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ 4 दावे, अन्यथा होईल मोठे नुकसान

by nagesh
Income Tax Saving Tips | income tax saving tips on parents insurance and investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Return | जर तुम्ही अजूनपर्यंत आपला इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल केला नसेल तर ताबडतोब रिटर्न दाखल करा. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर जवळ आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आयटी डिपार्टमेंटचे म्हणणे आहे की, ऑफिशियल वेबसाइट incometax.gov.in वर जाऊन प्राप्तीकर रिटर्न किंवा आयटीआर फायलिंग (ITR filing) करता येऊ शकते. इन्कम टॅक्स फाईल करताना हे 4 दावे करून तुम्ही टॅक्स वाचवू शकता.

इन्कम टॅक्स वाचवण्याचे हे आहेत 4 दावे

1. विना HRA घरभाड्यावर सूट

पगारदार असाल तर घरभाड्यापोटी दिलेल्या रक्कमेवर सूट मिळू शकते.
वेतनात हाऊस रेंट अलाऊन्स (एचआरए) चा समावेश असतो.
ज्यावर प्राप्तीकर कलम 10(13ए) अंतर्गत ठराविक मर्यादेपर्यंत सूट दिली जाते.

2. बचत खात्याच्या व्याजावर कपात

करदाता I-T कायदा कलम 80TTA अंतर्गत बचत खात्यातून व्याज उत्पन्नावर 10,000 पर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतो.
जर एकुण रक्कम मर्यादेपेक्षा खाली असेल तर पूर्ण रक्कम करमुक्त होईल. फिक्स्ड, रिकरिंग किंवा मुदत बचतीवर ही कपात मिळत नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

3. बिगर-विमित आई-वडिलांच्या वैद्यकीय बिलात कपात

आई-वडील ज्येष्ठ नागरिक असतील, जे विमा पॉलिसी अंतर्गत कव्हर नाहीत, परंतु वर्षादरम्यान वैद्यकीय उपचार घेतला आहे.
तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या वैद्यकीय बिलावर कपातीचा दावा करूशकता. कलम 80D वैद्यकीय खर्चावर कपातीसाठी आहे.
या अंतर्गत स्वता, कुटुंब आणि अवलंबित आई-वडीलांच्या आरोग्यासाठी भरलेल्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमवर कर वाचवू शकता.
स्वता / कुटुंबासाठी भरलेल्या प्रीमियमसाठी कलम 80 D कपातीची मर्यादा 25 हजार रुपये आहे.
ज्येष्ठ नागरिक भरलेला प्रीमियमवर 50 हजार रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात.

4. दान केले असल्यास कपात

प्राप्तीकर कायद्याचे कलम 80G, 80GGA, 80GGC अंतर्गत दान आणि वर्गणी दिली असल्यास टॅक्स बेनिफिट प्राप्त करण्याची तरतूद आहे.
प्राप्तीकर कलम 80G काही ठराविक रिलीफ फंड्स आणि चॅरिटेबल संस्थांना डोनेशन किंवा दान देऊन टॅक्स कपातीचा लाभ मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करते.

याचा फायदा व्यक्तीगत प्राप्तीकरदाता, कंपनी, एचयूएफ आणि NRIs सुद्धा घेऊ शकतात. परदेशी संस्था आणि राजकीय पक्षांना दिलेले दान किंवा वर्गणी या कक्षेत येत नाही.
कपातीचा दावा काही प्रकरणात 100 टक्के तर काही प्रकरणात 50 टक्केपर्यंत किंवा काहींमध्ये अमर्यादित असलेला असू शकतो.
दान चेक / ड्राफ्ट किंवा कॅशमध्ये दिले जाऊ शकते. (Income Tax Return)

Web Title : Income Tax Return | dont miss these 4 benefits while filing your income tax returns income tax department

हे देखील वाचा :

Parambir Singh | कोर्टानं फरार घोषित केलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर मुंबईत अवतरले

PAN Card ऑनलाइन कसे करावे व्हेरिफाय, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Retired ACP Shamsher Khan Pathan | ’26/11 हल्ल्यावेळी परामबीर सिंहांनी अतिरेकी कसाबचा मोबाईल लपवला’; निवृत्त ACP शमशेर खान-पठाण यांचा आरोप

Related Posts