IMPIMP

Income Tax Return | भाड्याच्या घरात राहात असतानाही प्राप्तीकरात मिळते सूट; जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

by nagesh
New TDS Rules | new tds rules now influencers will also have to pay tds new rules come into effect from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Return | तुम्हाला घरभाड्याच्या रूपात दिलेल्या रक्कमेवर प्राप्तीकरात सूट मिळवायची असेल तर, सर्वात पहिली अट पगारदार असण्याची आहे. तुमच्या वेतनात हाऊस रेंट अलाऊन्सचा (HRA) समावेश असतो, ज्यावर प्राप्तीकर कलम 10(13E) अंतर्गत ठराविक मर्यादेपर्यंत करसवलत दिली जाते. (Income Tax Return)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी
बहुतांश कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कर्मचार्‍यांसाठी हाऊस रेंट त्यांच्या सॅलरीचा भाग मानला गेला आहे. प्राप्तीकर कायदा 1961 मध्ये कर्मचार्‍यांना दिलेल्या घराच्या भाड्यावर कपातीचा दावा करण्याची तरतूद लागू करण्यात आली होती. असे कर्मचारी प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80GG च्या अंतर्गत भरलेल्या घरभाड्यावर सवलतीचा दावा करू शकतात.

सोबतच हा नियम स्वयंरोजगार करणार्‍यांसाठी सुद्धा लागू होतो, परंतु सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी जाणून घेणे आवश्यक आहे. जसे की कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी कर्मचार्‍याला आर्थिक वर्षादरम्यान एचआरए मिळालेला नाही पाहिजे.

HRA मध्ये सवलतीचा दावा करणारा करदाता कलम 80GG अंतर्गत भरलेल्या भाड्यावर कपातीचा दावा करू शकत नाही. सोबतच कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करणार्‍या व्यक्तीचे शहरात कोणतेही घर नसावे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

प्रत्यक्षात ज्या शहरात कार्यालय आहे किंवा व्यवसाय केला जात आहे, त्या शहरात पती किंवा पत्नी,
अल्पवयीन मुले किंवा हिंदू अविभाज्य कुटुंबाच्या नावावर कोणतेही घर नसावे.
काम करत असलेल्या शहरात घर असेल तर कपातीचा दावा करता येणार नाही.

कसा मिळेल कपातीचा लाभ?
करदात्याला एक फॉर्म 10BA दाखल करावा लागेल, ज्यानंतर तो या कपातीचा दावा करू शकतो.
ज्या करदात्याने पर्यायी किंवा नवीन करव्यवस्थेचा पर्याय निवडला असेल, तो या कपातीचा दावा करूशकणार नाही.
कपातीची गणना एका सूत्राच्या आधारावर केली जाते. (Income Tax Return)

Web Title :- Income Tax Return | income tax return employees can get tax deduction on rent without hra check details

हे देखील वाचा :

Nikki Tamboli | पुढे काय इच्छा आहे निक्की तांबोलीच्या प्रश्नाने चाहत्यांना लावलं वेड, भरभरुन केल्या कमेंट्स

IPL 2022 | CSK ने केला रैनाचा पत्ता कट तर ऋतुराजची ‘चांदी’, धोनीसोबत केला स्पेशल करार !

IPL 2022 | मुंबई इंडियन्समधून पांड्या बंधूचा पत्ता कट, तीन खेळाडू करणार रिटेन चौथ्यासोबत बोलणी सुरू

Related Posts