IMPIMP

Income Tax Returns | 4 कोटी लोकांनी जमा केला IT रिटर्न, ‘ही’ आहे ITR फायलिंगची शेवटची तारीख; जाणून घ्या उशीर केल्यास किती लागेल दंड

by nagesh
Old Income Tax Regime | old income tax regime with deductions must go said by revenue secretary tarun bajaj

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Returns | आर्थिक वर्ष 2020-21 साठी आतापर्यंत चार कोटीपेक्षा जास्त प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 8.7 लाख रिटर्न केवळ 21 डिसेंबरला जमा करण्यात आले. अर्थ मंत्रालयाने (finance ministry) बुधवारी ही माहिती दिली. (Income Tax Returns)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

प्राप्तीकर विभागाने एका ट्विटमध्ये म्हटले, प्राप्तीकर ई-फायलिंग पोर्टलवर आर्थिक वर्ष 2021-22 साठी 21 डिसेंबर 2021 पर्यंत चार कोटीपेक्षा जास्त आयटीआर प्राप्त झाले. मागील एक आठवड्यात 46.77 लाख आणि 21 डिसेंबरला 8.7 लाख आयटीआर रिटर्न दाखल करण्यात आले.

31 डिसेंबर शेवटची तारीख
मंत्रालयाने म्हटले की, करदात्यांसाठी प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्याची वाढवलेली शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. प्राप्तीकर विभागाने करदात्यांना शेवटची तारीख आठवण करून देण्यासाठी मेसेज आणि ईमेल पाठवला आहे. विभागाची आयटीआर जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती, जी वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली. (Income Tax Returns)

ITR फायलिंगला उशीर झाल्यास दंड –
डेडलाईनच्या अगोदर आयटीआर दाखल केल्यास दंड लागणार नाही. दंडाची ही रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत असू शकते. तत्पूर्वी प्राप्तीकर विभाग नोटिस पाठवून अलर्ट करतो.

वेळेवर आयटीआर फाईल केल्यास मिळेल फायदा –
वेळेवर आयटीआर फाईल करून लोक व्याजाची बचत करू शकतात.
नियमानुसार, एखाद्या टॅक्सपेयरने अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरलेला नसेल किंवा देय रक्कमेपेक्षा 90 टक्के कमी कर चुकवला असेल
तर त्यास एक टक्का प्रति महिन्याचा इंट्रेस्ट पेनल्टी म्हणून भरावा लागतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे व्याज सेक्शन 234बी अंतर्गत लागते, जे वेळेवर आयटीआर दाखल करून वाचवता येते.
वेळेवर आयटीआर भरल्यास इतरही सवलती मिळतात.

ITR फाईल करताना ठेवा लक्ष –
आयटीआर फायलिंगदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.
उदाहरणार्थ आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करावे लागेल.
ज्या बँकेच्या खात्यात तुम्हाला रिफंड हवा आहे, ती प्रीव्हॅलिडेट करावी लागेल.
फायलिंगच्या अगोदर योग्य आयटीआर निवडा. अन्यथा दाखल फॉर्म डिफेक्टिव्ह मानला जाईल.

Web Title :- Income Tax Returns | 4 crore people submitted income tax returns this is the last date for itr filing know how much will be the penalty for delay

हे देखील वाचा :

PM Kisan Yojana Date | ठरलं ! पीएम किसानचे 2 हजार रुपये ‘या’ तारखेला येणार, कृषी मंत्र्यांनी दिली माहिती

Chandrakant Patil | ‘राष्ट्रपती राजवट स्विकारुन कारभार केंद्राकडे द्या’ – चंद्रकांत पाटील

BJP MLA Gopichand Padalkar | ‘अजित पवारांना मुख्यमंत्री केले, तर 4 दिवसांत राज्य विकतील’

Related Posts