IMPIMP

Ind Vs Aus T20 | कोहलीने कॅच सोडताच रोहितने त्याची जागा बदलली, दुसऱ्याच चेंडूवर विराटने केले असे काही..

by nagesh
Ind Vs Aus T20 | indvsaus 2nd t20i rohit replaces kohli as he drops the catch virat shuts down captain on second ball

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Ind Vs Aus T20 | नागपूरमध्ये (Nagpur) भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील 2nd T20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना 8 -8 षटकांचा खेळवला गेला. यावेळी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी डावाची सुरुवात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकलेल्या षटकाने झाली. या सामन्यातील दुसरे षटक अक्षर पटेलने (Axar Patel) टाकले. या षटकातील पहिल्याच बॉलवर विराट कोहलीने सीमारेषेवर कॅमरून ग्रीनचा (Cameron Green) कॅच सोडला. त्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) विराटला (Virat Kohli) सीमारेषेवरून हटवले आणि 30 यार्डच्या सर्कलमध्ये तैनात केले. यानंतर पुढच्याच बॉलवर विराटने कॅमरून ग्रीनला रन आउट केले. (Ind Vs Aus T20)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय घडले नेमके?


विराटला 30 यार्डच्या सर्कलमध्ये आणल्यानंतर पुढच्याच बॉलवर कॅमरून ग्रीनने मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलवला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी विराट फिल्डींग करत होता. यानंतर विराटने बॉल अडवत स्टम्पच्या दिशेने बॉल फेकत ग्रीनला 5 धावांवर रन आउट केले. यामुळे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून देण्याच्या ग्रीनच्या इराद्यांवर विराटने पाणी फेरले. (Ind Vs Aus T20)

विराटने हा थ्रो केला तेव्हा सुरुवातीला कॅमरून ग्रीन धावचित नसल्याचे दिसून आले.
कारण विराटचा थ्रो थेट स्टम्पवर आला नव्हता. यानंतर थर्ड अंपायरकडून रिप्ले बघण्यात आला.
तेव्हा त्यामध्ये ग्रीन क्रिजमध्ये पोहोचण्यापूर्वीच यष्ट्या उडाल्याचे रिप्लेमध्ये दिसले.
यानंतर मैदानावरील अंपायरनी कॅमरून ग्रीनला रन आउट दिले. यानंतर भारतीय फॅन्सनी एकच जल्लोष केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ind Vs Aus T20 | indvsaus 2nd t20i rohit replaces kohli as he drops the catch virat shuts down captain on second ball

हे देखील वाचा :

Shivsena Vs Narayan Rane | ‘जास्त बोलायचं नाही, उलट-सुलट बोलाल तर याद राखा’, शिवसेनेचा नारायण राणेंना थेट इशारा

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना पूल रात्री किंवा पहाटे पाडणार

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

Related Posts