IMPIMP

Ind Vs Ban | भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का! कर्णधारासह ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर

by nagesh
Ind Vs Ban | ind vs ban big blow to bangladesh ahead of odi series against india captain along with legendary player out of squad

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – Ind Vs Ban | येत्या रविवारपासून भारत आणि बांगलादेश संघांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे. या मालिकेआधी बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बाल आणि त्यांचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद हे दोघेही दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत. (Ind Vs Ban)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष मिनहाजूल अबेदिन यांनी तमीम इक्बाल आणि तस्कीन अहमद यांना झालेल्या दुखापतीची माहिती दिली आहे. बांगलादेशच्या संघाने एकदिवसीय मालिकेसाठी आधीच संघाची घोषणा केलेली आहे. या संघाचे नेतृत्व तमीम इक्बाल करणार होता. मात्र, तमीम इक्बालला 30 नोव्हेंबर रोजी मिरपूरच्या शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर सराव करत असताना दुखापत झाली होती. तमीमच्या अनुपस्थितीत बांगलादेशचं नेतृत्व कोण करेल याची अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. (Ind Vs Ban)

भारत – बांगलादेश मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – 4 डिसेंबर
दुसरा एकदिवसीय सामना – 7 डिसेंबर
तिसरा एकदिवसीय सामना – 10 डिसेंबर

बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

बांगलादेशचा वनडे संघ
लिटन दास, अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरुल हसन,
अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, तस्कीन अहमद, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ind Vs Ban | ind vs ban big blow to bangladesh ahead of odi series against india captain along with legendary player out of squad

हे देखील वाचा :

Restrictions In Mumbai | मुंबई पोलिसांकडून जमाबंदीचे आदेश जारी; 2 जानेवारीपर्यंत ‘कर्फ्यू’सारखी बंधनं, 5 हून अधिकजण एकत्र येण्यावर बंदी, जाणून घ्या संपूर्ण आदेश

Pune Pimpri Crime | ‘पोलीस मला काही करु शकत नाहीत’ ! तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR

BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूंची निवड

Related Posts