IMPIMP

IND vs NZ : विराट कोहलीने शमीला ट्रोल करणार्‍यांना फटकारले, म्हणाला – ‘धर्मावरून निशाणा बनवणे तुच्छता’

by nagesh
IND vs NZ | ind vs nz icc t20 world cup 2021 virat kohli finally breaks silence on mohammad shami trolling after pakistan clash

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IND vs NZ | विराट कोहली (Virat Kohli) ने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 (ICC T20 World Cup 2021) सामन्यापूर्वी (IND vs NZ) सोशल मीडिया ट्रोलर्सला जोरदार फटकारले. विराट कोहलीने म्हटले, अनेक लोक सोशल मीडियामध्ये आपली ओळख लपवतात. नंतर खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात आणि हा त्यांच्या जीवनाचा अतिशय खालचा स्तर आहे. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे, ज्यामुळे ते हा ड्रामा करतात. आम्हाला माहिती आहे की, खेळाडूंचे समर्थन कसे केले जाते. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बाहेरील आवाजाला आमच्या दृष्टीने काहीही किंमत नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

विराट कोहलीने म्हटले, काही लोकांनी सोशल मीडियावर ट्रोलिंग केले. त्यांच्यात ना हिंमत आहे, ना कणा. आमच्या संघाला याची पर्वा नाही की बाहेर काय होत आहे. आम्ही केवळ खेळावर लक्ष केंद्रित करतो, जो खेळ आम्ही खेळतो.

विराट कोहलीने पुढे म्हटले, माझ्यासाठी, कुणाच्याही धर्मावर हल्ला करणे सर्वात निंदनीय बाब आहे. जे एक मनुष्य करू शकत नाही. धर्म प्रत्येकासाठी खुप पवित्र आहे. त्याने पुढे म्हटले, आम्ही 200 टक्के शमीसोबत आहोत. आमच्या बंधुभावाला, आमच्या मैत्रीला टीममध्ये धक्का लागू शकत नाही. लोक पुन्हा येऊ शकतात, परंतु आमच्या टीमध्ये (IND vs NZ) काहीही होणार नाही. एक कर्णधार म्हणून मी हे बोलू शकतो. देशासाठी मोहम्मद शमीचा (mohammed shami) जोश, आणि ज्याप्रकारे तो दिवसेंदिवस धावतोय, ते अविश्वसनीय आहे.

कोहलीने म्हटले, आम्ही जे करतो ते खेळासाठी करतो आणि यापैकी कुणीही (सोशल मीडिया ट्रोल्स) असे काही करण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. यांच्यात ना काही करण्याचे धाडस आहे आणि ना कणा, मी याकडे असे पाहतो. एक टीम म्हणून आम्ही समजतो की, आम्ही कशाप्रकारे एकमेकांच्या सोबत राहिले पाहिजे आणि आम्ही कोणत्या लोकांचे समर्थन केले पाहिजे आणि कशाप्रकारे आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जर तुम्ही बाहेरचे लोक असा विचार करत असाल की, भारताचा कोणत्याही मॅचमध्ये पराभव होऊ शकत नाही तर ते आमचे काम नाही,
कारण आम्ही खेळ खेळत आहोत. आम्हाला माहित आहे खेळ कसा असतो.
यासाठी लोक बाहेरून कसा विचार करतात,
यास आमच्या दृष्टीने काहीही किंमत नाही.
आम्ही कधीही त्याकडे लक्ष दिले नाही आणि आम्ही यापुढेही लक्ष देणार नाही.

हे आहे प्रकरण

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव पत्करावा लागला होता.
या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमी आणि टीम इंडियाला खुप ट्रोल करण्यात आले होते.
शमी आणि टीम इंडियाच्या ट्रोलिंगनंतर माजी आणि दिग्गज क्रिकेटर टीम इंडियाच्या समर्थनासाठी उतरले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबर म्हणजे रविवारी न्यूझीलंडसोबत आहे.
हा न्यूझीलंडचा सुद्धा दुसरा सामना आहे.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) दोन्ही संघांना टी20 वर्ल्ड कप 2021 च्या आपआपल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Web Title :- IND vs NZ | ind vs nz icc t20 world cup 2021 virat kohli finally breaks silence on mohammad shami trolling after pakistan clash

हे देखील वाचा :

Gold Demand | गतवर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या मागणीत ‘इतकी’ वाढ; जाणून घ्या

Sanjay Raut | ‘…पण माझी काय परंपरा अभ्यास करुन बोलायची नाही’ (व्हिडीओ)

Bhandara Crime | दुर्देवी ! 2 चिमुकल्या बहीण-भावांचा खेळता-खेळता तलावात पडून मृत्यू

Related Posts