IMPIMP

IND vs NZ | मुंबईकरांसाठी खुशखबर ! दुसऱ्या टेस्टबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय; या गोष्टीला दिली परवानगी?

by nagesh
IND vs NZ | india vs new zealand 2nd test maharashtra government allows 100 percentage seating at wankhede stadium thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन IND vs NZ | कोरोना (Corona) काळातील मोठ्या ब्रेकनंतर मुंबईत पुढील महिन्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडची टीम (IND vs NZ) सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट (India vs New Zealand 2nd Test) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे. 3 ते 7 डिसेंबर दरम्यान ही टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

भारत-न्यूझीलंड टेस्टपूर्वी महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनं या मॅचसाठी वानखेडे स्टेडियच्या संपूर्ण क्षमतेइतके म्हणजेच 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून हि माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना कोरोनाबाबतच्या गाईडलाईन्स पाळून मॅचचा आनंद स्टेडियममध्ये उपस्थित राहून अनुभवता येणार आहे. (IND vs NZ)

पहिल्या टेस्टसाठी (IND vs NZ) विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली असून
त्याच्या जागी अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) कर्णधारपद तर चेतेश्वर पुजाराकडे (Cheteshwar Pujara) उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत(Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah)
आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या चार प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) टेस्ट टीममध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया

अजिंक्य रहाणे (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा (व्हाईस कॅप्टन), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

Web Title :- IND vs NZ | india vs new zealand 2nd test maharashtra government allows 100 percentage seating at wankhede stadium thackeray government

हे देखील वाचा :

Data Plans For Airtel-Reliance Jio | केवळ 251 रुपयांत प्रीपेड प्लान्समध्ये मिळावा 50 GB डेटा, जाणून घ्या

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंनी व्यक्त केली खंत; म्हणाले – ‘शिवसेना, भाजपनं एकत्र यावं हीच इच्छा, पण…’

Amruta Fadnavis | ‘आओ कुछ तूफानी करते है, कल शाम ….मी पुन्हा’… ! अमृता फडणवीस यांचं ट्विट

Related Posts