IMPIMP

IND Vs NZ Test Series | टी-20 सीरिजमध्ये फेल तरीसुद्धा विराटच्या चौथ्या क्रमांकावर खेळणार ‘हा’ खेळाडू

by nagesh
IND Vs NZ Test Series | ind vs nz test series suryakumar yadav to be included in team india

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (IND Vs NZ Test Series) टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईट वॉश (White Wash) देत मालिकेत दणदणीत विजय मिळवला आहे. टी-20 सीरिजनंतर टीम इंडिया (India)आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला (IND Vs NZ Test Series) 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. घरच्या मैदानामध्ये टीम इंडियाचा टेस्टमध्ये रेकॉर्ड चांगला आहे, पण विराट कोहलीला (Virat Kohli) पहिल्या टेस्टसाठी तर रोहित शर्माला (Rohit Sharma) पूर्ण सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यातच आता सूर्यकुमार यादवला टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. जेव्हा भारताची टेस्ट टीम जाहीर केली तेव्हा सूर्यकुमारची टेस्ट टीममध्ये निवड झाली नव्हती.सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेरच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करता आली नव्हती. यानंतर आता सूर्यकुमार यादव कोलकात्यावरून टीमसोबत कानपूरला जाणार आहे. पहिली टेस्ट मॅच कानपूरला (Kanpur) खेळवण्यात येणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या सूर्यकुमार यादवने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने 129 इनिंगमध्ये 38 च्या सरासरीने 5,326 रन केले आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 26 अर्धशतकं यांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीमध्ये 200 रन हा सर्वोत्तम स्कोअर आहे. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने 3 वनडे आणि 11 टी-20 मॅच खेळल्या आहेत. त्यामुळे आता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. याचबरोबर श्रेयस अय्यरलाही (Shreyas Iyer) टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

विराट कोहली पहिली टेस्ट खेळणार नाही, त्यामुळे अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो.
26 वर्षांच्या श्रेयस अय्यरने 92 इनिंगमध्ये 52 च्या सरासरीने 4,592 रन केले आहेत, यात 12 शतकं आणि 23 अर्धशतकं यांचा समावेश आहे.
नाबाद 202 रन त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.
पहिल्या टेस्टमध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ओपनर म्हणून खेळू शकतात.
तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) निश्चित आहेत.
त्यामुळे आता चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर, शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये स्पर्धा असणार आहे.
पहिल्या टेस्टसाठी रहाणे टीमचा कर्णधार तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे.
या सिरीजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) नव्या पर्वाला सुरूवात होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- IND Vs NZ Test Series | ind vs nz test series suryakumar yadav to be included in team india

हे देखील वाचा :

Amboli Girls Dance Party | आंबोलीच्या एका हॉटेलमधील पार्टीत नाचवल्या मुली; पोलिसांची धाड, दारुसाठा जप्त

Parambir Singh | काय सांगता ! होय, परमबीर सिंग फरार, जुहूमधील फ्लॅटच्या दरवाज्यावर न्यायालयाची ऑर्डर

Cryptocurrency | Shih Tzu ने गुंतवणुकदारांना केले मालामाल! केवळ 2 तासात 1000 रुपये झाले रू. 60 लाख

Related Posts