IMPIMP

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

by nagesh
Pimpri Chinchwad Corona | same housing project 43 people contracted coronary heart disease

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा (COVID19) कहर अद्यापही सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या 24 तासांत तब्बल दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सलग दुसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 93 हजार 528 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

देशात गेल्या 24 तासात 2 लाख 739 कोरोना COVID19 रुग्ण आढळून आले आहेत. तर 93 हजार 528 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1038 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 40 लाख 74 हजार 564 वर पोहचली आहे. आतापर्यंत 1 कोटी 24 लाख 29 हजार 564 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच देशाच सध्याच्या घडीला 14 लाख 71 हजार 877 अॅक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 123 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

दरम्यान, बुधवारी देशात कोरोनाचे 1 लाख 84 हजार रुग्ण आढळून आले होते. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक होता. मात्र, आज (गुरुवार) रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आणि नवा उच्चांकाची नोंद झाली आहे. बुधवारी कोरोनामुळे 1027 जणांना जीव गमवावा लागला होता. गेल्या सहा महिन्यातील कोरोनाबळींचा COVID19 हा उच्चांक होता.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts