IMPIMP

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

by nagesh
India reports 2,95,041 new COVID19 cases, 2,023 deaths and 1,67,457 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा (covid19) कहर पहायला मिळत असन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात कोरोना रुग्ण आढळून येण्याचा वेग वाढला असून याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक राज्यात ऑक्सिजन तुटवडा जाणवत असून ऑक्सिजनअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे. देशात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक उच्चांकी रुग्णसंख्या गेल्या 24 तासात नोंदवण्यात आली. गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. देशात एका दिवसात 2 लाख 95 हजार 041 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (बुधवार) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तसांत कोरोनाचे covid19 2 लाख 95 हजार 041 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 023 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 एवढी झाली आहे. कोरोनामुळे covid19 मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 82 हजार 553 वर पोहचला आहे. देशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 21 लाख 57 हजार 538 एवढी आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील 6 लाख 83 हजार रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 1 लाख 67 हजार 457 रुग्ण बरे झाल आहेत. देशात आजपर्यंत 1 कोटी 32 लाख 76 हजार 039 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात 13 कोटी 1 लाख 19 हजार 310 लोकांना लस देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सध्य स्थितीची माहिती देताना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर 1.93 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन 1.75 टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर 0.40 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे. सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर 4.29 टक्के रुग्ण होते. आता ते 4.03 टक्के इतके आहेत.

Also Read :

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts