IMPIMP

India vs Pakistan | भारत- पाक सामन्यापूर्वी हा खेळाडू झाला जखमी, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

by nagesh
 T20 World Cup | ab de villiers predict india and new zealand will face in final of t20 world cup

मेलबर्न: वृत्तसंस्था – रविवारी म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि अटीतटीचा सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मात्र या दोन्ही संघामध्ये सध्या खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र सुरूच आहे. भारताचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), दीपक चहर (Deepak Chahar) हे खेळाडूं वर्ल्डकप मधून दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भारत-पाक सामन्यापूर्वीच (India vs Pakistan) नेटमध्ये सराव करत असताना एका खेळाडूला दुखापत झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नेमकं काय घडलं ?

सराव सुरू असताना पाकिस्तानी (India vs Pakistan) फलंदाज शान मसूदच्या (Shan Masood) डोक्याला मार लागला आणि तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. सराव सत्रादरम्यान मेलबर्न क्रिकेट स्टेडियम मध्ये (Melbourne Cricket Stadium) शान मसूद हा मोहम्मद नवाजच्या (Mohammad Nawaz) चेंडूंवर सराव करत होता. यादरम्यान एक चेंडू त्याच्या डोक्याला लागला. त्यानंतर तो जमिनीवर पडला.

यानंतर शान मसूदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शान मसूदच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट नसले तरी शान ज्या पद्धतीने जमिनीवर पडला,
त्यावरून ही दुखापत गंभीर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर शान मसूद गंभीर जखमी झाला तर हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
शान मसूद हा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  India vs Pakistan | india vs pakistan t20 world cup 2022 pak player shan masood got injured in net practice and admitted hospital

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊत यांचा माध्यमांसोबत संपर्क टाळण्यासाठी पोलीस सावध

Pune Congress | चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवणार ‘खुळखुळा’ दिवाळी भेट, काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले – ‘ते राजकारणाला खेळ…’

MCA Election | एमसीए निवडणुकीत पवार-शेलार पॅनलने मारली बाजी, अमोल काळे MCA चे नवे अध्यक्ष

Related Posts