IMPIMP

India Vs South Africa 2021 | ऐतिहासिक क्षण ! भारताने पहिला कसोटी सामना जिंकला; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

by nagesh
India Vs South Africa 2021 | indias historic victory in 1st test against south africa at centurion and took a 1 0 lead in the series

सेंच्युरियन : वृत्तसंस्था India Vs South Africa 2021 | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीत भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी (India Vs South Africa 2021) पराभव केला. गुरुवारी सामन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या दिवशी 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 191 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सेंच्युरियन (Centurion) मैदानावर भारतीय संघाने (Team India) कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सोडून आफ्रिकेचा या मैदानावर पराभव करणारा भारत फक्त तिसरा देश आणि आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दक्षिण आफ्रिकेशिवाय टीम इंडियाने यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही कसोटी सामने जिंकले आहेत. संघाने हा पराक्रम केवळ दुसऱ्यांदा केला
आहे. यापूर्वी 2018 मध्येही भारताने हे केले होते. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियात 2 कसोटी जिंकल्या. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने प्रत्येकी एक
कसोटी जिंकली. 2021 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी १ कसोटी जिंकली. इंग्लंडमध्ये 2 कसोटी जिंकण्यात संघाला यश आले. मात्र, 2021 मध्ये या अर्थाने पहिल्यांदाच संघ ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यात यशस्वी झाला. तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेतली. 2018 मध्ये, संघाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये मालिका गमावली होती. त्यामुळे 2021 चा विजय हा भारतीय क्रिकेटच्या 89 वर्षांच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण म्हणता येणार आहे. (India Vs South Africa 2021)

दरम्यान, पहिल्या कसोटीच्या 5 व्या दिवशी भारताने विजय मिळवला असला तरी त्याचा पाया चौथ्या दिवशी रचला गेला होता.
काल (बुधवारी) दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने 4 बाद 94 धावा केल्या होत्या.
भारताच्या जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) अखेरच्या षटकात विकेट घेऊन आफ्रिकेला दणका दिला होता.
त्यानेच आज (गुरूवारी) अखेरच्या दिवशी आफ्रिकेला पहिला धक्का दिला.
काल दिवसभर शानदार फलंदाजी करणारा आणि भारताच्या विजयातील सर्वात मोठं सकट असणारा कर्णधार डीन एल्गर (Captain Dean Elgar) याला बुमराहने 77 रणांवर बाद केले.
एल्गरच्या विकेटने भारताला विजयाचा मार्ग मोकळा झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : India Vs South Africa 2021 | indias historic victory in 1st test against south africa at centurion and took a 1 0 lead in the series

हे देखील वाचा :

Post Office Saving Schemes | घरात मुल जन्माला येताच पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, 5 वर्षात मुल होईल ‘लखपती’ !

MPSC विरुद्ध लिहाल तर काही परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल, आयोगाचा विद्यार्थ्यांना इशारा; विद्यार्थ्यांकडून संताप

New Year Celebration | नवीन वर्षाच्या उत्सवात भान हरवू नका ! ‘या’ चुकांमुळे तुमच्या घरात येऊ शकतो कोरोना व्हायरस

Related Posts