IMPIMP

Indian Post Office New Facility | खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! पोस्ट ऑफिसने आणली नवीन सुविधा; जाणून घ्या सविस्तर

by Team Deccan Express
Indian Post Office New Facility | post office news neft rtgs facility to be available for post office savings account

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Indian Post Office New Facility | पोस्ट ऑफिसकडून (Indian Post Office) खातेधारकांसाठी (Account Holder) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता पोस्ट ऑफिसमधील खातेदार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे ट्रान्सफर (Transfer) करू शकणार आहे. विभागाने 17 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात NEFT आणि RTGS ची सुविधा टपाल कार्यालयाकडून सुरू करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही नवीन सुविधा खातेधारकांच्या सोयींची (Indian Post Office New Facility) असणार आहे.

विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, 18 मे पासून NEFT ची सुविधा सुरू झाली आहे. तसेच RTGS ची सुविधा आगामी 31 मे 2022 पासून उपलब्ध होणार आहे. अर्थात आता पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना पैसे पाठवणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. आरटीजीएसच्या सुविधेबाबत चाचण्या सुरू असल्याचे देखील परिपत्रकात सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ही सुविधा 31 मे 2022 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. (Indian Post Office New Facility)

दरम्यान, 10 हजार रुपयांपर्यंतच्या NEFT साठी, तुम्हाला 2.50 रुपये + GST भरावा लागणार आहे. 10 हजार ते १ लाख रुपयांसाठी हे शुल्क 5 रुपये + GST पर्यंत वाढले आहे. त्याचबरोबर 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी 15 रुपये + GST आणि 2 लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी 25 रुपये + GST भरावा लागणार आहे.

NEFT आणि RTGS म्हणजे काय ?

NEFT आणि RTGS च्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधी हस्तांतरित करू शकता.
पैसे हस्तांतरित करण्याची ही एक जलद प्रक्रिया आहे. एनईएफटीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा नाही,
तर आरटीजीएसमध्ये एका वेळी किमान २ लाख रुपये पाठवावे लागतात.
एनईएफटी पेक्षा आरटीजीएस मध्ये पैसे अधिक वेगाने पोहोचतात. ही सेवा 24×7×365 असणार आहे.

Web Title : Indian Post Office New Facility | post office news neft rtgs facility to be available for post office savings account

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts