IMPIMP

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती; कोरोनामुळे बंद असलेल्या ‘प्रगती एक्स्प्रेस’, ‘पुणे-भुसावळ एक्स्प्रेस’ रेल्वेगाड्या पुन्हा धावणार

by nagesh
Indian Railways | Central Railway to start Pragati Express, Pune-Bhsawal Express soon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Indian Railways | कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक वाहनांवर निर्बंध लावण्यात आलं होतं. त्याचबरोबर अनेक रेल्वे
(Indian Railways) देखील बंद करण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर
आता मध्य रेल्वे प्रशासनाकडून (Central Railway Administration) रेल्वे गाड्या पुन्हा सुरळीत करण्यात येत आहे. पुणे-मुंबई (Pune-Mumbai) दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस (Pragati Express), सह पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (Pune-Bhusawal Express) आता धावणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस, सह पुणे-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी  नाशिक मार्गे धावत असल्याने पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची दोन सोय होणार आहे. या दोन्ही गाड्या साधारण 22 महिन्यानंतर आता पुन्हा धावणार आहेत. 19 जानेवारीपासून या गाड्या ट्रॅकवर येणार असल्याने प्रवाशांची आता सोय होणार आहे. (Indian Railways)

मागील अनेक दिवसांपासून प्रगती एक्स्प्रेस (Pragati Express) सुरू करावी अशी मागणी प्रवाशांची होती. त्याला आता पुर्णविराम मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून पुणे व सोलापूर विभागाला रेक तयार ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यानुसार दोन्ही विभागाने त्याप्रमाणे रेक तयार करून ठेवला आहे. १९ जानेवारीपासून प्रगती एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्याहून भुसावळला जाणाऱ्या गाडीसाठी सोलापूर-पुणे धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसचा (Hutatma Express) रेक वापरला जातो. त्यामुळे याबाबत सूचना सोलापूर विभागाला दिल्या आहेत. हुतात्मा व भुसावळ एक्स्प्रेस साठी 2 रेक आवश्यक असतात. ते रेक तयार झालेत. त्याचबरोबर सोलापूर-मिरज एक्स्प्रेसला (Solapur-Miraj Express) प्रतिसाद नसल्यामळे या गाडीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. ही गाडी आता पुणे विभागातील (Pune Division) कोल्हापूर स्थानकावरून सुटेल मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे कलबुर्गी (गुलबर्गा ) येथे दाखल होईल. ही गाडीही लवकरच धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Indian Railways | Central Railway to start Pragati Express, Pune-Bhsawal Express soon

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांची 20 लाख खंडणी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय अस्तित्वच नाही; देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

Nora Fatehi | नोरा फतेहीने स्पोर्ट्स ब्रा घालून केला ‘गदर डान्स’, व्हिडीओने उडवली खळबळ

Related Posts