IMPIMP

Indore-Pune Bus Accident | इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 प्रवाशांचा मृत्यू

by nagesh
Indore-Pune Bus Accident | bus fell from bridge coming to pune in indore madhya pradesh 13 dead

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था Indore-Pune Bus Accident | मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Indore-Pune Bus Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू (13 Passengers Died) झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील धार येथे घडली आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची (MSRTC) होती. धार येथून ही बस पुण्यासाठी येत होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली आहे. दरम्यान या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात आलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे.
मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title :- Indore-Pune Bus Accident | bus fell from bridge coming to pune in indore madhya pradesh 13 dead

हे देखील वाचा :

Attack On BJP Leader In Mumbai | मुंबईत भाजपच्या महिला नेत्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ

GST Rates Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! जीवनावश्यक वस्तूंसोबत ‘या’ वस्तूही महागणार; जाणून घ्या

Pune Minor Girl Rape Case | स्कुल बसचालकाचा बसमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रिलेशनशीपमध्ये राहणार का विचारून केला लैंगिक अत्याचार

Related Posts