IMPIMP

Indrani Balan Winter T-20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच, वालेकर स्पोर्ट्स संघांची विजयी कामगिरी !!

by nagesh
Indrani Balan Winter T-20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance of Manikchand Oxyrich, Walekar Sports Teams !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Indrani Balan Winter T-20 League 2022 | बालन ग्रुपतर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच आणि वालेकर स्पोर्ट्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी आगेकूच केली. (Indrani Balan Winter T-20 League 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नीलय नेवासकर याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीला ११६ धावा धावफलकावर लावता आल्या. नीलय नेवासकर याने १३ धावांत ३ गडी, तर रोहन फंड याने २९ धावांत २ गडी टिपले. माणिकचंद ऑक्सिरीचने हे आव्हान १४.५ षटकांत व २ गडी गमावून पूर्ण केले. ऋषभ राठोड याने ५३ धावांची, तर दर्शित मोदी याने ३६ धावांची खेळी केली. या दोघांनी ५१ चेंडूत ६६ धावांची भागीदारी रचत विजयाचा पाया रचून संघाला विजयीपथावर नेले. संघाचा हा तिसरा विजय ठरला.

Balan-Group2-1.webp (750×430)

विशाल गव्हाणे याच्या ६० धावांच्या खेळीमुळे वालेकर स्पोर्ट्स संघाने क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा १५ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना वालेकर स्पोर्ट्सने १६१ धावांचे आव्हान उभे केले. विशाल गव्हाणे याने ६० धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा डाव १४६ धावांवर मर्यादित राहिला. सूर्या चाकरे (४२ धावा) आणि कृष्णा दौंड (४० धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. (Indrani Balan Winter T-20 League 2022)

Balan-Group3.webp (750×430)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमीः १७.२ षटकांत १० गडी बाद ११६ धावा (हरी सावंत ३४, प्रज्योत हरळीकर २२,
नीलय नेवासकर ३-१३, रोहन फंड २-२९) पराभूत वि. माणिकचंद ऑक्सिरीचः १४.५ षटकांत २ गडी बाद ११८
धावा (ऋषभ राठोड ५३ (३७, ३ चौकार, २ षटकार), दर्शित मोदी ३६, दिलीप मालविया नाबाद १९);
(भागीदारीः पहिल्या गड्यासाठी ऋषभ आणि दर्शित यांच्यात ६६ (५१); सामनावीरः नीलय नेवासकर;

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वालेकर स्पोर्ट्सः २० षटकांत ७ गडी बाद १६१ धावा (विशाल गव्हाणे ६० (५१, ६ चौकार, २ षटकार),
हरीश पी. २४, रचित चौगुले नाबाद १९, अभिषेक शिरोडकर ४-२४) वि.वि. क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण्सः
२० षटकांत ८ गडी बाद १४६ धावा (सूर्या चाकरे ४२, कृष्णा दौंड ४०, हरीश पी. २-२५); सामनावीरः विशाल गव्हाणे.

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Winning performance of Manikchand Oxyrich, Walekar Sports Teams !!

हे देखील वाचा :

ENG vs PAK 2nd Test | अबरार अहमदने पदार्पणातच रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज

Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 23 जणांवर कारवाई

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

Related Posts