IMPIMP

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमीचा दुसरा विजय; इव्हॅनो इलेव्हन संघाने गुणांचे खाते उघडले

by nagesh
Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Second win for Punit Balan Kedar Jadhav Academy; Ivano XI team opened the points account

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन- Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमी संघाने सलग दुसरा विजय मिळवला. इव्हॅनो इलेव्हन संघाने स्पर्धेत पहिला विजय नोंदविला आणि गुणांचे खाते उघडले. (Indrani Balan Winter T20 League 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अभिमन्यु जाधव याच्या ४८ धावांच्या खेळीच्या जोरावर पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमी संघाने एसके डॉमिनेटर्स संघाचा ७६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिमन्यु जाधव (४८ धावा), कौस्तुभ पाटील (४३ धावा), दिग्विजय जाधव (३९ धावा) आणि रोहीत करंजकर (३२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमीने २० षटकात १६६ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना एसके डॉमिनेटर्स संघाचा डाव ९० धावांवर गडगडला. अनिकेत इंद्रजीत (३-१६) आणि अक्षय चव्हाण (३-१५) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

Balan-Group-2.webp (696×399)

तुषार सिन्हा याच्या कामगिरीच्या जोरावर इव्हॅनो इलेव्हन संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा १२४ धावांनी पराभव केला. इव्हॅनो इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावांचा डोंगर उभा केला. तुषार सिन्हा याने ८१ धावांची तर, योगिराज देशमुख याने ८० धावांची खेळी केली. हिमांशु अगरवाल (४३ धावा) आणि अमित पवार (नाबाद ३६ धावा) यांनीही धावांचे योगदान देत संघाला २६४ धावसंख्या गाठून दिली. या धावसंख्येचा पाठलाग करताना क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्सचा डाव १४० धावांवर मर्यादित राहीला.

Balan-Group-3.webp (696×399)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद १६६ धावा (अभिमन्यु जाधव ४८ (२५, २ चौकार,
५ षटकार), कौस्तुभ पाटील ४३, दिग्विजय जाधव ३९, रोहीत करंजकर ३२) वि.वि. एसके डॉमिनेटर्सः १६.२ षटकात १० गडी बाद ९० धावा
(अजय बोरूडे ३४, अनिकेत इंद्रजीत ३-१६, अक्षय चव्हाण ३-१५); सामनावीरः अभिमन्यु जाधव

इव्हॅनो इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद २६४ धावा (योगिराज देशमुख ८० (३५, ५ चौकार, ७ षटकार),
तुषार सिन्हा ८१ (३०, ४ चौकार, ९ षटकार), हिमांशु अगरवाल ४३, अमित पवार नाबाद ३६,
हृषीकेश जोशी ३-४७) वि.वि. क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्सः १९ षटकात १० गडी बाद १४० धावा
(संकेत देवकर ६० (४५, ७ चौकार, २ षटकार), चेतन शर्मा २८, हृषीकेश जाधव ४-३४, तुषार सिन्हा २-७); सामनावीरः तुषार सिन्हा

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Second win for Punit Balan Kedar Jadhav Academy; Ivano XI team opened the points account

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | मंगलप्रभात लोढांच्या विधानाची टीका करणाऱ्यांमध्ये आदित्य ठाकरेंची भर; ट्विटद्वारे म्हणाले, “गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं म्हणजे…”

Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..

Related Posts