IMPIMP

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; द गेम चेंजर्स संघाचा सलग दुसरा विजय

by nagesh
Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Victory Salute of Vision Cricket Academy Team; Second win in a row for The Game Changers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’
अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने विजयी सलामी देत शानदार सुरूवात केली. द गेम चेंजर्स संघाने सलग दुसर्‍या विजयाची
नोंद करून आपली घौडदौड कायम ठेवली. (Indrani Balan Winter T20 League 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत धीरज थोरात याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने न्युट्रिलिशियस् संघाचा ५ गडी राखून पराभव केला. गोलंदाजांचे वर्चस्व राहीलेल्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रिलिशियस् संघाला १५.१ षटकात ८९ धावा जमविता आल्या. न्युट्रिलिशियस् संघाच्या आत्मन पोरे (२३ धावा) आणि रोहीत खरात (१७ धावा) यांनी खेळपट्टीवर धावा जमविल्या. धीरज थोरात (२-६), सुरज राठोड (२-१७) आणि अंकित जाधव (२-१९) यांच्या अचूक गोलंदाजीपुढे न्युट्रिलिशियस्चा डाव झटपट गुंडाळला गेला. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १२.२ षटकात आवश्यक धावा जमविल्या. सौरव मोरे (२७ धावा), श्रेयस काकडे (नाबाद २४ धावा) आणि धीरज थोरात (२० धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

देवदत्त नातू याच्या स्फोटक ८४ धावांच्या जोरावर द गेम चेंजर्स संघाने वालेकर स्पोर्ट्सचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना संदीप मोर्य (२८ धावा), हरीश पी. (३४ धावा) आणि रचित चौगुले (२७ धावा) यांच्या फलंदाजीमुळे वालेकर स्पोर्ट्सने १२८ धावांचे आव्हान उभे केले. द गेम चेंजर्स संघाने ८.२ षटकात व २ गडी गमावून आपले ध्येय सहज पार केले. देवदत्त नातू याने २७ चेंडूत ९ चौकार आणि ७ षटकारांसह ८४ धावांची तुफानी खेळी केली. तुषार श्रीवास्तव याने नाबाद २३ धावा करत त्याला योग्य साथ दिली. या दोघांनी सलामीला खेळताना ३८ चेंडूत ११४ धावांची तुफानी भागिदारी करून संघाचा विजय सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
न्युट्रिलिशियस्ः १५.१ षटकात १० गडी बाद ८९ धावा (आत्मन पोरे २३, रोहीत खरात १७, धीरज थोरात २-६,
सुरज राठोड २-१७, अंकित जाधव २-१९) पराभूत वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १२.२ षटकात ५ गडी बाद ९० धावा
(सौरव मोरे २७, श्रेयस काकडे नाबाद २४, धीरज थोरात २०, आत्मन पोरे ३-११); सामनावीरः धीरज थोरात;

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वालेकर स्पोर्ट्सः २० षटकात ९ गडी बाद १२८ धावा (संदीप मोर्य २८, हरीश पी. ३४, रचित चौगुले २७,
समर सिंग ३-३२, सिध्देश वारघंटे ३-१५) पराभतू वि. द गेम चेंजर्सः ८.२ षटकात २ गडी बाद १२९ धावा
(देवदत्त नातू ८४ (२७, ९ चौकार, ७ षटकार),
तुषार श्रीवास्तव नाबाद २३);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी देवदत्त आणि तुषार यांच्यात ११४ (३८); सामनावीरः देवदत्त नातू;

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Victory Salute of Vision Cricket Academy Team; Second win in a row for The Game Changers

हे देखील वाचा :

Sharad Pawar On Maharashtra Karnataka Border Issue | ‘बेळगाव, कारवार आणि निप्पाणी देणार असाल, तर ‘जत’च्या ठरावावर चर्चा करु’ – शरद पवार

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

Related Posts