IMPIMP

IPL 2021 Final | आज फैसला ! यंदा विजेतापदाचा मानकरी कोण?, CSK का KKR?

by nagesh
IPL 2021 Final | kolkata knight riders vs chennai super kings ipl final 2021 pitch report and weather update and other updates

दुबई : वृत्तसंस्था IPL 2021 Final | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर क्रिकेट क्षेत्रावरही कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर साधारण चार महिन्यानंतर दोन टप्प्यांत सामना खेळवावा लागला. तर यंदाचा आयपीएल क्रिकेटच्या 14 व्या हंगामाचे जेतेपदाचा मान कोणाचा असणार? याची उत्कंठा आता
शिगेला पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आज (शुक्रवारी) आयपीएल 2021 ची (IPL 2021
Final) अंतिम लढत होणार आहे. दुबईच्या (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत यंदा आयपीएल कप कोण जिंकणार? याची ओढ सर्व आयपीएल क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कॅप्टन इयॉन मॉर्गन (Eoin
Morgan) या दोघांनी त्याच्या देशांना वर्ल्डकप जिंकून दिला आहे. आयपीएलमध्ये चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली तीन वेळा तर गौतम गंभीरच्या
नेतृत्वाखाली दोन वेळा आयपीएल कपवर (IPL 2021 Final) आपलं नाव कोरलं आहे. तर, आयपीएलच्या 14 व्या हंगामात चेन्नईची कामगिरी सर्वात सातत्यापूर्ण झाली आहे. या उटल कोलकाताने पहिल्या सत्रात फक्त 2 विजय मिळवले होते. पण त्यानंतर त्यांना चांगली लय सापडली. दरम्यान, चेन्नईची ही 9 वी फायनल तर केकेआरची 3 री फायनल आहे.

* चेन्नई सुपर किंग्ज टीम –

– महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, के. एम. आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहिर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.

* कोलकाता नाईट रायडर्स टीम –

– ईऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिराट सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, लॉकी फग्र्युसन, पवन नेगी, एम प्रसिध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, टिम सेफर्ट.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title: IPL 2021 Final | kolkata knight riders vs chennai super kings ipl final 2021 pitch report and weather update and other updates

हे देखील वाचा :

Earn Money | ‘या’ फंडने एका वर्षात दिला 99.68% चा रिटर्न, बनला बेस्ट इक्विटीज प्रॉडक्ट, तुम्ही सुद्धा करू शकता गुंतवणूक

Pune Crime | घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयानं दिला ‘समेट’साठी वेळ, फारकतीच्या कालावधीत 27 वर्षीय पत्नीवर 32 वर्षीय पतीचा ‘बलात्कार’

Pune Crime | खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयाच्या निवृत्त प्राचार्यासह चौघांवर गुन्हा दाखल; अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली उकळले 17 लाख

Related Posts