IMPIMP

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

by nagesh
IPL 2023 | ipl 2023 bcci introduces new rule for new season impact player rule know wht

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2022) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानली जाते. त्यामुळे अनेक खेळाडू आपल्या नॅशनल टीमपेक्षाही IPL 2022 स्पर्धेला जास्त प्राधान्य देतात. यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता स्पर्धेतील टीमची एकूण संख्या 10 होणार आहे. सध्या आयपीएलच्या या सीजनपूर्वी एक मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार असून त्याची तयारी सुरु आहे. त्यापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) फ्रँचाझीचे सहमालक नेस वाडीया (Ness Waida) यांनी बीसीसीआयला (BCCI) एक क्रांतिकारक प्रस्ताव दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यांनी आपल्या प्रस्तावामध्ये ‘विदेशातील ज्या शहरांमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे त्या शहरात खेळाडूंची उपलब्धता पाहून ऑफ सिझनमध्ये 3 ते 5 मॅच घेण्यात याव्या असे सांगितले आहे. तसेच दरवर्षी टॉप 4 टीमना मियामी, सिंगापूर किंवा टोरंटो या शहरांमध्ये काही सामने खेळण्याची परवानगी देण्यात यावी. यामुळे आयपीएलचा ब्रँड आणखी मजबूत होण्यास मदत होईल. खेळ आता व्यवसाय बनला आहे. टी20 लीग यासाठी योग्य आहे. आपल्याला हा टप्पा गाठण्यासाठी 14 वर्ष लागली आहेत. पण, अखेर हे झालं याचा मला आनंद आहे.’ असेदेखील नेस वाडीया म्हणाले.जर याची अंमलबजावणी झाली तर IPL 2022 चं स्वरूप पूर्ण बदलणार आहे.

याचबरोबर खेळाडूंना सातत्यानं बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) राहवं लागत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
यामुळे खेळाडूंना येणाऱ्या मानसिक आणि शारीरिक थकव्याकडं लक्ष दिलं पाहिजे, असं मतसुद्धा नेस वाडीया यांनी व्यक्त केले आहे.
आयपीएलमध्ये आता 2 नव्या टीम सहभागी झाल्या आहेत.
अहमदाबाद (Ahmedabad) टीमसाठी सीव्हीसी कॅपिटलनं (CVC Capital) 5625 कोटींची बोली लावली.
तर, लखनऊ (Lucknow) टीमला आरपी संजीव गोयंका ग्रुपनं (RP Sanjiv Goenka Group) 7090 कोटींना खरेदी केलं.
या व्यवहारातून बीसीसीआयला 12,715 कोटींची कमाई झाली आहे.
आता पुढील सिझनमध्ये 60 ऐवजी 74 मॅच खेळवण्यात येणार आहेत. दोन नव्या टीमच्या सहभागामुळे आगामी आयपीएल अधिक रोमांचक होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- IPL 2022 | ipl 2022 bcci allows ipl teams to play exhibition games overseas-in off season says punjab kings owner ness wadia

हे देखील वाचा :

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

IPL 2022 | मुंबई-चेन्नई लढतीनं सुरू होणार आयपीएलचा थरार ! जाणून घ्या मोठी अपडेट

Municipal Election | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग?

Related Posts