IMPIMP

IPL 2022 | मुंबई-चेन्नई लढतीनं सुरू होणार आयपीएलचा थरार ! जाणून घ्या मोठी अपडेट

by nagesh
IPL 2022 | ipl 2022 is likely to start on april 2 in chennai reports match at Chepauk Stadium Chennai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टी 20 लीग असलेल्या IPL 2022 च्या तयारीला सुरुवात झाली आहे. IPL 2022 पूर्वी मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनौ (Lucknow) या दोन नवीन संघांचा समावेश होणार आहे. या सिझनची सुरूवात चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) होम ग्राऊंड असलेल्या चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवरून (Chepauk Stadium) होणार आहे. या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार आहेत. पहिला सामना 2 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे. 60 दिवस ही स्पर्धा चालणार असून फायनल मॅच 4 किंवा 5 जून रोजी होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

IPL 2022 स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये गतविजेती चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम खेळणार हे स्पष्ट असले तरी तिच्या विरुद्ध कोणती टीम खेळणार हे अजून निश्चित झाले नाही. सध्या 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नाव यामध्ये सर्वात आघाडीवर दिसत आहे. प्रत्येक टीम 14 सामने खेळणार असून यामध्ये 7 सामने होम ग्राऊंडवर आणि 7 बाहेरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.आयपीएलचा पुढील सिझन भारतामध्येच होणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी यगोदरच केली आहे.

IPL 2022 मध्ये दोन नव्या टीमच्या सहभागामुळे आगामी सिझन अधिक चुरशीचा होईल असे जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.
आयपीएलच्या मागील सिझनचा (IPL 2021) सुरुवातीचा भाग भारतामध्ये झाला.
कोरोना व्हायरसच्या (Coroa Virus) उद्रेकामुळे त्यानंतर उत्तरार्ध यूएईमध्ये (UAE) शिफ्ट करावा लागला.
या स्पर्धेची फायनल देखील यूएईमध्येच झाली. आयपीएल स्पर्धेचा मेगा ऑक्शन डिसेंबरमध्ये होणार आहे.
तो आणखी खास होईल,अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- IPL 2022 | ipl 2022 is likely to start on april 2 in chennai reports match at Chepauk Stadium Chennai

हे देखील वाचा :

Municipal Election | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग?

PPF Account | पीएफ अकाऊंट झालं असेल मॅच्युअर तर ‘या’ 3 ऑप्शनद्वारे काढू शकता पैसे, मिळत राहिल फायदा; जाणून घ्या

Anti Corruption Bureau Thane | गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणार्‍या हवालदारावर गुन्हा दाखल

Related Posts