IMPIMP

IPL 2023 | यंदाच्या आयपीएलच्या नियमांत होणार मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

by nagesh
IPL 2023 | There will be major changes in the rules of this year's IPL; Learn about the new rules

सरकारसत्ता ऑनलाईन  – क्रिकेट हा जरी भारताचा पारंपारिक खेळ नसला तरी क्रिकेटचे चाहते भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. सर्व क्रिकेट चाहते
हे दरवर्षी आयपीएलची (IPL 2023) आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या आयपीएलला (IPL 2023) 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदाचा
सीझन हा आयपीएलचा 16 वा सिझन असणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये आयपीएलच्या नियमांत मोठे बदल पाहायला मिळणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे नियम?

आतपर्यंत आयपीएलच्या (IPL 2023) इतिहासात टॉस होण्याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपल्या संघातील प्लेईंग 11 खेळाडूंची यादी जाहीर करावी लागायची. त्यामुळे अनेकदा टॉस हरल्यावर संघाच्या परफॉर्मन्सवर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत होता. आता या नियमात बदल केल्यामुळे आता टॉस झाल्यानंतर संघांचे कर्णधार आपल्या संघाची प्लेईंग 11 जाहीर करू शकणार आहेत.  यामुळे टॉस हरलेल्या संघाला याचा फटका बसू नये तसेच दोन्ही संघांना समसमान संधी देण्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या नव्या नियमाबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

हे नियमसुद्धा होणार लागू’

टूर्नामेंट समितीने आधीच ‘इम्पॅक्ट सबस्टिट्युशन’ (Impact substitution) (प्रभावी खेळाडूची जागा) जाहीर केली आहे. यामध्ये पाच नियुक्त बदली खेळाडूंमधून सामन्यादरम्यान नवीन खेळाडू बदलला जाणार आहे. निर्धारित वेळेत ज्या संघाची षटके पूर्ण होणार नाहीत अशा संघांना प्रत्येक षटकासाठी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक ठेवण्याचा नियम लावला जाणार आहे. हा एकप्रकारे ओव्हर रेट दंड (Over rate penalty) आकारण्याचा प्रकार आहे. जर सामन्यामध्ये यष्टिरक्षकाने काही चुकीचे केले तर चेंडू डेड घोषित केला जाईल आणि त्या बदल्यात  फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच अतिरिक्त धावा देण्यात येणार आहे. तसेच जर क्षेत्ररक्षकाने काही चूक केली तरी चेंडू डेड घोषित केला जाईल त्या बदल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच अतिरिक्त धावा दिल्या जातील. आयपीएलच्या अगोदर दक्षिण आफ्रिकेतील नुकत्याच पार पडलेल्या टी -20 लीगमध्ये हे नियम लागू करण्यात आले आहेत.

Web Title : IPL 2023 | There will be major changes in the rules of this year’s IPL; Learn about the new rules

हे देखील वाचा :

Pune Aam Aadmi Party (AAP) Letter To Chandrakant Patil | पुणे : आम आदमी पार्टीकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना खुले पत्र, ‘आप’ म्हणतंय – ‘दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !’

Zwigato Movie Tax Free | कपिल शर्माच्या ‘झ्विगाटो’ चित्रपटाला ‘या’ राज्याने केला टॅक्स फ्री; दिग्दर्शिकेने ट्वीट करून दिली माहिती

Chowk Marathi Movie | गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चौक’ची तारीख जाहीर, 12 मे ला होणार प्रदर्शित; महाराष्ट्रातल्या चौकाचौकाची गोष्ट

Related Posts