IMPIMP

IPS Deepak Pandey | बदलीनंतर नाशिक पोलीस आयुक्त म्हणाले – ‘मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही, कारण…’

by nagesh
IPS Deepak Pandey | Maharashtra IPS police transferred nashik police commissioner deepak pandey about not regret any decision have taken

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली (Maharashtra IPS Officer
Transfer) आणि पदोन्नतीचे (Maharashtra IPS Officer Promotion) आदेश बुधवारी काढण्यात आले. बुधवारी राज्याच्या गृह विभागाकडून
(Maharashtra Home Department) परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (IPS Deepak Pandey) यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागेवर जयंत नाईकनवरे (IPS Jayant Naikanvare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीच्या आदेशानंतर बोलताना पोलीस आयुक्त दीपक पांडे (IPS Deepak Pandey) म्हणाले, मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते. (Maharashtra Police Transfer)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडे (IPS Deepak Pandey) यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना शहरात कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखण्यात दीपक पांडे यशस्वी राहिले. त्यामध्ये हेल्मट सक्ती असो किंवा महसूल आयुक्त (Revenue Commissioner) विरोधात टाकलेला लेटर बॉम्ब असो, पांडे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

लेटर बॉम्ब विषयी आजही ठाम
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची महिला अत्याचार विभागात बदली करण्यात आली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले महिला अत्याचार प्रतिबंध विभाग महानिरीक्षक (Inspector General of Prevention of Violence Against Women) पदी बदली झाली, बदलीसाठी मीच विनंती केली होती. नाशिकमध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर पांडे यांनी कारवाईचे पाऊल उचलत राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक कोकणात (Konkan) रवाना केले होते. राणे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केल्याचे पांडे यांनी सांगितले. तसेच महसूल विभागाच्या लेटर बॉम्ब विषयी आजही ठाम असल्याचे सांगत दीड वर्षाची वादळी कारकीर्द अखेर संपुष्टात अल्याचेही पांडे यांनी सांगितले.

सर्व निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून घेतले
भोंगे संदर्भात (Azaan Loudspeakers) नवा आदेश काढला याबाबत कोणाला न्यायालयात जायचं असेल तर त्यांनी जावे, सर्व निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून घेतले, एकही निर्णयाचा पश्चाताप नाही, सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तसे RDX, डिटोनेटर हे शब्द चुकीचे वाटत नसल्याचे सांगत मतावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस दलात 23 वर्षे सेवा केल्यानंतर समाजाला काही दिल नाही तर कधी देणार ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
निवृत्त झाल्यावर काही बोलण्यापेक्षा पदावर असताना नजरेस आणून दिलेले कधीही योग्यच असते, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

धोरणात्मक निर्णय घेता येतील
महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाची प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली, त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येतील.
महिलांबाबत अनेक चांगले निर्णय घेता येतील. मुंबईमध्ये गोदावरी नदी नसल्याने पुन्हा नळाच्या पाण्यात आंघोळ करावी लागणार आहे.
मात्र सर्वांनी नदीमध्ये स्नान करावे असे आवाहन पांडे यांनी नाशिकच्या नागरिकांना केले.

Web Title :- IPS Deepak Pandey | Maharashtra IPS police transferred nashik police commissioner deepak pandey about not regret any decision have taken

हे देखील वाचा :

Flour For Summer Season | उन्हाळ्यात पोटात थंडावा वाढवण्यासाठी सेवन करा ‘या’ 4 पिठाची भाकरी, पचन राहील ‘फिट’ आणि आरोग्य राहील ‘तंदुरुस्त’

BJP MLA Ganesh Naik | अटक टाळण्यासाठी भाजप आमदार गणेश नाईकांनी उचललं हे पाऊल !

Figs Benefits | अंजीर खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

Related Posts