IMPIMP

IPS Officer Rashmi Shukla | रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने पुणे पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट फेटाळला

by nagesh
IPS Officer Rashmi Shukla | rashmi shukla does not have a clean chit the court rejected the closer report in the phone tapping case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – पुणे पोलिसांनी (Pune Police) रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट (Closure Report) न्यायालयात सादर केला होता. मात्र, न्यायालयाने पुणे पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणाची (Phone Tapping Case) चौकशी सुरु झाली होती. त्यानंतर राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यानंतर याचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे-फडणवीस सरकारने रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांचा तपास बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. तपास बंद करण्यासाठी पोलिसांनी क्लोजर रिपोट न्यायालयात सादर केला होता. परंतु पुणे पोलिसांचा हा रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला धक्का असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?

रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार (Telegraph Act) गुन्हा दाखल आहे.
फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)
यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागात आयुक्त (State Intelligence Commissioner)
असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.
दरम्यान याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
याच समितीने राज्य शासनाला (State Government) अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title :- IPS Officer Rashmi Shukla | rashmi shukla does not have a clean chit the court rejected the closer report in the phone tapping case

हे देखील वाचा :

Pune Pimpri Accident | मोबाईलवर बोलत दुचाकी चालवणं बेतलं जिवावर, अपघात होऊन तरुणाचा मृत्यू

Rohit Pawar | सभागृहात ऊर्जामंत्र्यांच्या भाषणालाच वीज गेली आणि रोहित पवारांनी लगावला खोचक टोला

Manasi Naik | प्रदिप खरेराच्या इंन्स्टा रीलवर भडकली मानसी नाईक; म्हणाली….

Winter Session – 2022 | राज्यात लवकरच 4000 जागांसाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांची भरती – गिरीश महाजन

Related Posts