IMPIMP

IPS Sanjay Pandey | संजय पांडे यांची कामगिरी उत्कृष्ट ! तरीही UPSC नं महासंचालक पदासाठी शिफारस केली नाही

by nagesh
IPS Sanjay Pandey | mumbai police commissioner sanjay pandey discusses mumbaikar's issues

सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे (IPS Sanjay
Pandey) यांच्याकडे २०२१ पासून सोपवण्यात आला आहे. त्याला अँड. दत्ता माने (Adv. Datta Mane) यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका
(Mumbai High Court) दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Datta) आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक (Justice Makrand Karnik) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी UPSC ने जाणीवपूर्वक उत्कृष्ट कामगिरी व प्रशंसनीय रेकॉर्डकडे दुर्लक्ष केले. उल्लेखनीय एसीआर (सेवा पुस्तिका) असतानाही तीनपैकी दोन निवड समिती सदस्यांच्या दुर्लक्षामुळे यूपीएससीने महासंचालक पदासाठी आपल्या नावाची शिफारसच केली नाही असा जोरदार युक्तिवाद प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. दरम्यान, युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खंडपीठासमोर ज्येष्ठ काऊन्सिल नवरोज सिरवाई यांनी पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्यावतीने युक्तिवाद केला. ते म्हणाले की, आयुष्यातील ३० वर्षे पोलीस सेवेसाठी पांडे (IPS Sanjay Pandey) यांनी दिली आहेत. ते अत्यंत सचोटीचे अधिकारी असून नोव्हेंबर २०२१ पासून प्रत्येक सेवा पुस्तिकेत आठ व त्याहून अधिक श्रेणी मिळवली आहे. हि बाब उल्लेखनीय असतानाही यूपीएससीच्या तीनपैकी दोन निवड समिती सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणात पांडे सर्वाधिक प्रभावित झाले असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Web Title :- IPS Sanjay Pandey | dgp sanjay pandeys argument in the mumbai high court

हे देखील वाचा :

Cough Problem | सतत होत असेल खोकला तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जीवघेणे असू शकते कारण

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण, स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

Rashmi Uddhav Thackeray | रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल

Related Posts