IMPIMP

IPS Sudhir Hiremath | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

by nagesh
IPS Sudhir Hiremath | IPS sudhir hiremath will take additional charge of commissioner of police solapur city police

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइनसोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त हरिष बैजल (Solapur CP Harish Baijal) हे 31 मे रोजी सेवानिवृत्त (Retired) होत आहेत. अवघ्या सात महिन्यांचा कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील (Solapur City Police Force) आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार (Additional Charge) आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त निवृत्त होत असताना त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा सुरु असतानाच आज (सोमवार) आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस आयुक्त सेवानिवृत्त होत असताना, दुसरीकडे शहराला नवीन कोणता अधिकारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. वेगवेगळ्या चर्चांमधून अनेकांची नावे पुढे येत होती. मात्र, सोमवारी अचानाक आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये (Pune CID) उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General) म्हणून ते कार्यरत आहेत.
मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त हरिष बैजल यांच्यकडून पदभार घेऊन अतरिक्त पोलीस आयुक्त पदाची सुत्रे सुधीर हिरेमठ हाती घेणार आहेत.

दरम्यान, आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार हा तात्पुरत्या कालावधीसाठी राहणार असल्याचं सध्यातरी सांगण्यात आलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- IPS Sudhir Hiremath | IPS sudhir hiremath will take additional charge of commissioner of police solapur city police

हे देखील वाचा :

Solapur Crime | धक्कादायक ! पत्नीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं; मग साडीने घेतला गळफास

Pune Minor Girl Rape Case | मैत्रिणीच्या घरी बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

UPSC Final Result 2021 | युपीएससीचा निकाल जाहीर ! प्रियवंदा म्हाडदळकर महाराष्ट्रातून पहिली; उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून अभिनंदन

Related Posts