IMPIMP

IRCTC Dividend | इन्व्हेस्टर्सला भेट देणार आयआरसीटीसी, आता मिळेल 75 टक्के डिव्हिडंट

by nagesh
IRCTC Dividend | irctc dividend announcement 2022 to give 75 percent eligible shareholders record date

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IRCTC Dividend | भारतीय रेल्वे (Indian Railways) ला केटरिंग सेवा पुरवणार्‍या आयआरसीटीसी (IRCTC) च्या शेअरधारकांना या आठवड्यात एक शानदार भेट मिळणार आहे. कंपनी या आठवड्यात आपल्या शेअर होल्डर्स (IRCTC Shareholders) ला 75 टक्के अंतिम डिव्हिडंट देणार आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) साठी 19 ऑगस्ट ही फायनल डिव्हिडंटची रेकॉर्ड डेट (IRCTC Dividend Record Date) निश्चित केली आहे. (IRCTC Dividend)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एजीएमच्या 30 दिवसांच्या आत पेमेंट
रेकॉर्ड डेटच्या हिशेबाने जे शेअरधारक पात्र ठरतील त्यांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी 75% अंतिम डिव्हिडंट लाभ मिळेल. आयआरसीटीसीने गेल्या महिन्यात स्टॉक एक्स्चेंजला सांगितले होते की, वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणताही डिव्हिडंट मंजूर झाल्यास तो बैठकीच्या 30 दिवसांच्या आत दिला जाईल. आयआरसीटीसीच्या कोणत्या शेअरधारकांना डिव्हिडंट भेट मिळेल, हे रेकॉर्ड डेटनुसार ठरवले जाईल. (IRCTC Dividend)

डिव्हिडंटची रेकॉर्ड डेट आणि पेमेंट डेट (IRCTC Dividend Payment Date) भिन्न असते. रेकॉर्ड डेट म्हणजे ती तारीख जिच्या आधारावर डिव्हिडंटसाठी पात्र असलेल्या शेअरधारकांची निवड केली जाते. त्याच वेळी, डिव्हिडंटची पेमेंट डेट ठरवण्यासाठी एजीएम (IRCTC AGM) मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर ठरते. रेकॉर्ड डेटच्या लगेच आधीच्या तारखेला एक्स-डिव्हिडंड तारीख म्हणतात. साधारणपणे, ते गुंतवणूकदार लाभांशासाठी पात्र मानले जातात, ज्यांनी एक्स डिव्हिडंट डेट (IRCTC Ex-Dividend Date) पेक्षा एक दोन दिवसापर्यंत कंपनीचे शेअर खरेदी केलेले असतात. एक्स डिव्हिडंट डेटनंतर शेअर खरेदी करणार्‍या इन्व्हेस्टर्सला त्या कालावधीसाठी डिव्हिडंटचा लाभ मिळत नाही.

या महिन्यात होणार बैठक
आयआरसीटीसीची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी, कंपनीच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी शेअर होल्डर्सना 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति शेअरवर 1.50 रुपये अंतिम डिव्हिडंट (Interim Dividend) देण्याची शिफारस केली होती. हा लाभांश 160 कोटी रुपयांच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या 75 टक्के आहे. कंपनीने यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये प्रति शेअर 2 रुपये अंतरिम डिव्हिडंट दिला होता, तो देखील अदा करण्यात आला आहे. एजीएमच्या तारखेनुसार, आयआरसीटीसीच्या शेअर होल्डर्सना 26 सप्टेंबरपर्यंत अंतिम डिव्हिडंटचे पेमेंट देखील मिळेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जून तिमाहीत कंपनीला इतका प्रॉफिट
आज, आयआरसीटीसी शेअर (IRCTC Share Price) सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई (BSE) वर 0.50 टक्क्यांच्या तेजीसह 670 रुपयांच्या जवळ व्यवहार करत होता.
सध्या कंपनीचे मार्केट कॅप (IRCTC MCap) 53,556 कोटी रुपये आहे.
जून 2022 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (IRCTC Net Profit) 245.52 कोटी रुपये होता,
जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 198 टक्क्यांनी जास्त आहे.
या कालावधीत कंपनीचा महसूल (IRCTC Revenue) 250.34 टक्क्यांनी वाढून 852.59 कोटी रुपये झाला आहे.

Web Title :- IRCTC Dividend | irctc dividend announcement 2022 to give 75 percent eligible shareholders record date

हे देखील वाचा :

Supriya Sule | ‘बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसत आहेत’ – सुप्रिया सुळे

Rain Alert | राज्यात पुढील 3 तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Sudhir Mungantiwar | ‘शिवसेनेची टीका म्हणजे स्वत:कडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे’ – सुधीर मुनगंटीवार

Related Posts