IMPIMP

IRCTC-Post Office | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा बुक करू शकता ट्रेनचे तिकीट

by nagesh
Central Railway | Demand to implement promotion reservation in Central Railway, otherwise All India SC, ST Railway Employees Association warns of march

नवी दिल्ली – वृत्त संस्थाIRCTC-Post Office | तुम्ही भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी (IRCTC) एक नवीन योजना सुरु करत आहे. आता तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये सुद्धा ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. या सुविधेमुळे स्टेशनच्या काऊंटरवर गर्दी होणार नाही. (IRCTC-Post Office)

माहितीनुसार, रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) 6 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या 9147 पोस्ट ऑफिसमधून रेल्वे रिझर्वेशन तिकीट जारी करण्याची योजना सुरु करतील.

6 जानेवारीपासूनच सर्व राज्यांच्या सर्व ब्रँच पोस्ट ऑफिसपर्यंत ग्रामीण पोस्ट सेवक म्हणजे जीडीएस (Gramin Dak Sevaks) प्रवाशांसाठी ट्रेन रिझर्वेशन तिकीट बनवू शकतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गोमतीनगर स्टेशनवरून नवीन ट्रेन रवाना करतील रेल्वेमंत्री

6 जानेवारीला रेल्वेमंत्री गोमतीनगर रेल्वे स्टेशनवरून नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. याशिवाय अश्विनी वैष्णव ट्रेनच्या दुरूस्तीसाठी बनवलेल्या वॉशिंग पिट लाईनचे सुद्धा उद्घाटन करतील.

स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी धावतील 75 वंदे भारत ट्रेन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी 75 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. वंदे भारत बनवण्यासाठी टेंडर प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. यामध्ये 9 कंपन्यांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. (IRCTC-Post Office)

Web Title : IRCTC Post Office | irctc indian railway minister to launch train ticket reservations at post offices

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर कमी; जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

Coronavirus Cases Today In India | देशात अनियंत्रित कोरोना केसमध्ये 56% प्रचंड वाढ, गेल्या 24 तासात 90928 केस; ओमिक्रॉनचा आकडा 2630

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

Maharashtra Rains | महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस कोसळणार? विकेंडला पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा

Related Posts