IMPIMP

Irrigation scam | सिंचन घोटाळा प्रकरणात ‘या’ अधिकाऱ्याची एन्ट्री, केला गंभीर आरोप म्हणाले – ‘गेल्या 10 वर्षात घोटाळ्याची चौकशीच झाली नाही’

by nagesh
Irrigation scam | irrigation scam case entry of vijay Pandhare in the allegation that there was no inquiry into the scam in the last 10 years

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांनी काही दिवसांपूर्वी सिंचन घोटाळा प्रकरणात (Irrigation scam) एका राष्ट्रवादीच्या (NCP) बड्या नेत्याला अटक होणार असा दावा करणारं ट्विट केलं होतं. यानंतर आता सिंचन घोटाळा प्रकरणात (Irrigation scam) निवृत्त अधिकारी विजय पांढरे (Vijay Pandhare) यांची एन्ट्री झाली आहे. मागील दहा वर्षात सिंचन घोटाळ्याची चौकशीच (Inquiry) झाली नाही, असा दावा पांढरे यांनी केला आहे. विजय पांढरे यांनीच जलसंपदा विभागातील घोटाळा समोर आणला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विजय पांढरे म्हणाले, सिंचन घोटाळा (Irrigation scam) अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे. असे असताना मागील 9-10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळा उघडकीस आला असून कोणतीही कारवाई केलेली नाही. केवळ कारवाई होते असे नाटक केले जाते. मात्र प्रत्यक्षात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

चितळे समितीने (Chitale Committee) सिंचन घोटाळा प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे.
नागपूर खंडपीठासमोर (Nagpur Bench) परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार (Ajit Pawar) यांना क्लिनचीट दिली.
मात्र खंडपीठाने ती अद्याप मान्य केली नाही. भ्रष्टाचाराचे प्रकरण रेंगाळणे हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण नसल्याचे पांढरे म्हणाले.
अजित पवार यांना 2019 मध्ये सिंचन घोटाळ्यातून क्लिन चिट देण्यात आली होती.

कोण आहेत विजय पांढरे ?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहूर गावचे पांढरे ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जलसिंचन खात्यात कामाला होते.
30 वर्षाच्या सरकारी नोकरीत असताना त्यांनी त्यांचे काम निडरपणे केलं.
अजित पवार सारख्या नेत्याच्या राजीनाम्याला अप्रत्यक्ष कारणीभूत ठरलेले विजय पांढरे यांना मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न केला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Irrigation scam | irrigation scam case entry of vijay Pandhare in the allegation that there was no inquiry into the scam in the last 10 years

हे देखील वाचा :

Dahi Handi-2022 | ‘आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय’, दहीहंडी उत्सवात फडणवीस यांची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

Aditya Thackeray | ’50 थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहितेय’ – आदित्य ठाकरे

Ashish Shelar | आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार; म्हणाले – ‘आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही…’

Related Posts