IMPIMP

Irsal – Official Trailer | आपल्या ‘ईर्षे’साठी अल्पवयीनांना का धरता वेठीस ! ‘इर्सल’मध्ये ‘अल्पवयीन’च्या हातात पिस्तुल देऊन साधायचे काय?

by Team Deccan Express
Irsal - Official Trailer | Why hold on to minors for your jealousy ! What to do with a pistol in the hands of a minor in Irsal marathi movie ?

सरकारसत्ता ऑनलाइन Irsal – Official Trailer | गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या (Minor Children) वाढत्या सहभागामुळे पोलीस (Police) तसेच समाजसेवक (Social Worker) चिंतेत आहे. नकळत हातून गुन्हा (Crime) घडलेल्या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी विश्वापासून दूर करुन त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था (NGO) कार्यरत आहेत. असे असताना अल्पवयीन मुलांच्या हातात पिस्तुल (Pistol) देऊन त्यांना या गुन्हेगारी विश्वाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना (Irsal – Official Trailer) असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘इर्सल’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्याचा फर्स्ट लुक प्रदर्शित (Irsal – Official Trailer) झाला आहे. हा फर्स्ट लुक पाहिल्यावर अनेक प्रश्न मनात उभे रहातात. पूर्वी चित्रपटात दारु पिताना (Drinking Alcohol) किंवा सिगारेट ओढताना (Smoking Cigarette) सर्रास दाखविले जात होते. पण, त्याचा समाजावर होणार्‍या दुष्परिणाम लक्षात घेऊन त्यावर अनेक निर्बंध आणण्यात आली आहे. सिगारेट पित असल्याचे दृश्य दाखवित असताना बाजूला त्यापासूनची धोक्याची सुचना देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच दारू पितानाचे दृश्य दाखविताना त्यावर अशीच धोक्याची सूचना दाखविण्याचे बंधन घातले आहे. मात्र, इतर बाबींना शासनाच्या सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) पूर्ण मोकळीक दिल्याचे दिसून येत आहे.

‘इर्सल’ चित्रपटाची (‘Irsal’ Movie) कथा दांडेकर पुलाचे (Dandekar Bridge) नाव घेऊन होत असली तरी ती देशातील कोणत्याही झोपडपट्टीतील राजकारण, गुंडागर्दी यात चपराक बसेल अशी फर्स्ट लुकवरुन दिसून येत आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे म्हटले जाते. ते प्रत्यक्ष पडद्यावर दाखविताना त्यात लहान मुलांचा वापर करुन घेण्यात आला आहे. रस्त्याने एखादा गुंड जात असेल व त्याला आजूबाजूचे लोक सलाम करत असतात. पैशांनी गब्बर असलेले त्याच्यासमोर झुकताना तेथील लहान मुले पाहतात. त्यामुळे त्यांना गुंडा विषयी आकर्षण निर्माण होते. ते आपल्या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचा फोटो डीपी म्हणून ठेवल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अशा मुलांचे पोलिसांनी समुपदेशन (Counseling) करुन त्यांना त्यामागील धोके समजावून सांगितले होते. गुंड गजा मारणे (Gajanan Marne) याची तळोजा कारागृहातून (Taloja Jail) सुटका झाल्यावर त्याने मोठी रॅली काढली होती. या रॅलीचे फोटोही अनेक तरुणाने आपल्या डीपीवर ठेवले होते. गुंडाच्या अशा कृतीचे तरुणांमध्ये आकर्षण निर्माण होते. त्याला आपण हवा देण्याचा प्रयत्न करायचा का? त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रश्न आहे.

आपला मुलगाच गुंडाचा फोटो पाकीटात ठेवतो, हे पाहून पोलीस अधिकारी हबकून जातो. तेव्हा पोलीस ठाण्यात त्या गुंडाला बोलावून त्याची धुलाई करुन त्याचा खरा चेहरा या मुलासमोर उभा करणारे दृश्य ‘मुळशी पॅटर्न’(Mulshi Pattern) मध्ये दाखविले आहे. त्याचा खूप चांगला परिणाम साधला गेला असावा.

इर्सलच्या पोस्टरमध्ये गुलालाने माखलेल्या हातात पिस्तुल दाखविण्यात आले आहे.
इर्सल मधील फर्स्ट लुकमध्ये शेवटी एक अल्पवयीन मुलगा आता पिस्तुलीतून गोळीबार करताना दाखविला आहे.
त्यावर “डावपेचाचा थरार आणि बंदुकाचा धाक” अशी टॅगलाईन येते. एका बाजूला सिगारेट,
दारु पिण्यावर चित्रपटात बंधने आणण्यात आली असताना अल्पवयीन मुलांच्या हातात पिस्तुल दाखविताना
त्यांचे ग्लोरिफाय करण्याच्या अशा प्रयत्नांवर निर्बंध आणण्याचा आपण कधी विचार करणार.
की विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली असा धुडगुस खपवून घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title :- Irsal – Official Trailer | Why hold on to minors for your jealousy !
What to do with a pistol in the hands of a minor in Irsal marathi movie ?

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts