IMPIMP

Jacqueline Fernandez | 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल; जॅकलीन फर्नांडिस अडचणीत

by nagesh
Jacqueline Fernandez | actor jacqueline fernandez is now an accused in 215 crore extortion case marathi news latesy updates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात (Charge Sheet) जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) नाव आरोपी म्हणून सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश हा गुन्हेगार असल्याचे जॅकलिनला आधीच माहिती होती, असा ईडीचा दावा आहे. सुकेश हा खंडणीखोर (Extortion) आहे हे देखील तिला माहित होते. यामुळे ईडीने तिच्यावर ताशेरे ओढले आहेत. ईडीने 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आरोपी असल्याचं म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ईडीने समन्स बजावल्यानंतर जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) दिल्लीतील ईडी कार्यालयात (Delhi ED Office) चौकशी (Inquiry) करण्यात आली होती.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात तिचे नाव समोर आलं होतं. सुकेशकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणे महागात पडलं आहे.
मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) ईडीनं तिला थांबवलं होतं.
200 कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जॅकलिनला अद्याप अटक (Arrest) झालेली नाही. कारण आतापर्यंत न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नाही.
असं असलं तरी अभिनेत्रीला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

काय आहे प्रकरण ?

सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले.
त्यानंतर ईडीने कारवाई करत त्याची 7 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणीने (Pinky Irani) सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे.
सुकेशने पिंकीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू व रोख रक्कम दिली होती.

जॅकलीनला अरबी घोडा, मांजर गिफ्ट

सुकेश चंद्रशेखर याने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिले होते.
यात अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्यकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पार्शियन मांजरांचा समावेश आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – Jacqueline Fernandez | actor jacqueline fernandez is now an accused in 215 crore extortion case marathi news latesy updates

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Session | MPSC आणि B.Ed CET परीक्षा एकाच दिवशी, सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

Pune Crime | बिटकॉईनमधील फसवणुकीचा आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस; 42 कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिटकनेक्टचे सतिश कुंभाणीसह 7 जणांवर FIR

Pune Crime | ‘आरएसएस संघराज्य’ या फेक खातेधारकावर पुण्यात FIR, जितेंद्र आव्हाडांनी केली होती कारवाईची मागणी

Related Posts