IMPIMP

Jacqueline Fernandez | अखेर वर्षभरानंतर कोर्टाने अभिनेत्री जॅकलीनला दिली विदेश प्रवासाला परवानगी

by nagesh
 Jacqueline Fernandez | delhi patiala house court allows jacqueline fernandez travel to dubai attend conference

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : अनेक दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चर्चेत होती. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी मनीलाँड्रिंग प्रकरणात तिला देखील अनेक गोष्टींच्या सामोरे जावे लागले होते. या प्रकरणामुळे तिच्या विदेशी प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता जॅकलीनला थोडा दिलासा मिळाला आहे. कारण पटियाला हाऊस कोर्टने अभिनेत्री जॅकलीनला (Jacqueline Fernandez) विदेश प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. तर आता जॅकलीन लवकरच दुबईला जाणार आहे. मात्र जॅकलीनला हा प्रवास कोर्टाच्या अटी आणि शर्तीनुसार करावा लागणार आहे. विदेशी प्रवासादरम्यान जॅकलीन कुठे कुठे जाणार याची आधीच माहिती तिला कोर्टाला द्यावी लागणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याआधी देखील जॅकलीनने कुटुंबीयांना भेटण्यासाठी विदेशात जाण्याची मागणी केली होती. मात्र तिची ही याचिका कोर्टाने फेटाळली होती. यंदा जॅकलीनची याचिका न फेटाळल्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे. पेप्सी को इंडिया संमेलनात जॅकलीनला सहभागी व्हायचे असल्याने ती दुबईला जाणार आहे. या प्रवासासाठी जॅकलिनला परवानगी मिळाल्याने अनेक दिवसांनी ती भारता बाहेरचा प्रवास करणार आहे.

200 कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश हा मुख्य आरोपी आहे. मात्र या प्रकरणात जॅकलीनची (Jacqueline Fernandez) ईडीकडून अनेकदा चौकशी करण्यात आली होती.
या दरम्यान जॅकलीनला अनेकदा पटियाला कोर्टच्या पायऱ्या देखील चढाव्या लागल्या होत्या.
जॅकलीन फर्नांडिसच्या ‘टेल इट लाइक अ वुमन’ या चित्रपटातील ‘अल्पॉज’ या गाण्याला 2023 चे ऑस्कर नामांकित मिळाले होते.
बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरीमध्ये हे नामांकन मिळाले असल्याने जॅकलीन आनंदी झाल्याचे दिसून आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jacqueline Fernandez | delhi patiala house court allows jacqueline fernandez travel to dubai attend conference

हे देखील वाचा :

Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts