IMPIMP

Jalgaon ACB Trap | 5 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी तलाठयासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

जळगाव :  सरकारसत्ता ऑनलाईन – Jalgaon ACB Trap | 7 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 5 हजार रूपयाची लाच घेणारा तलाठी आणि कोतवाल जळगाव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्याविरूध्द चाळीसगाव ग्रामीण (Chalisgaon Gramin Police Station) पोलिस ठाण्यात गुन्हा (Jalgaon Crime News) दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon ACB Trap)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ज्ञानेश्वर सुर्यभाव काळे (50, तलाठी, मौजे बोरखेडा बु., तलाठी कार्यालय, ता. चाळीसगाव, जि. जळगाव. रा. शिवशक्ती नगर, भडगाव रोड) आणि किशोर गुलाबराव चव्हाण (37, कोतवाल, मौजे बोरखेडा बु., रा. श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या वडिलांनी त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रान्वये तक्रारदार यांच्या नावे बोरखेडा बु. येथील शेतजमीन केलेली आहे. तक्रारदार यांच्या हिश्यावर एकुण 3 गट वाटणीस आलेले आहेत. (Jalgaon Bribe Case)

सदर 3 गटांपैकी 64/2 ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नीच्या नावे करायची आहे. जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील. म्हणून नोव्हेंबर 2021 मध्ये तलाठी ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितल्याप्रमाणे सदरचे प्रकरण सादर केलेले आहे. सदर शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी यापुर्वी तलाठी काळे यांनी 7 हजार रूपये घेतलेले आहेत. तरी देखील सदर काम न झाल्यामुळे तक्रारदार तलाठी काळे यांना जावून भेटले. त्यावेळी परत त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. तलाठी काळे यांच्यावतीने कोतवाल किशोर चव्हाण यांनी 7 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. दि. 23 मार्च रोजी पचांसमक्ष तलाठी काळे यांनी लाच घेतली. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon ACB Trap)

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक एन.एस. न्याहळदे,
वाचक पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील,
पोलिस निरीक्षक श्रीमती एन.एन. जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्दाव, पोलिस अंमलदार ईश्वर धनगर,
राकेश दुसाने, सचिन चाटे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे,
कर्मचारी सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदिप पोळ, अमोल सुर्यवंशी आणि प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jalgaon ACB Trap | Talatha along with Kotwal in anti-corruption net in 5 thousand rupees bribery case

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे खोचक शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले- ‘जशी स्क्रिप्ट आली, तशी…’

Maharashtra Politics News | उध्दवजी अजूनही काही बिघडलेलं नाही, पुन्हा एकदा शांतपणे विचार करा; ठाकरेंना सभागृहातच ऑफर

MLA Ashish Shelar | ‘तुमच्यात हिंमत असेल तर…’, आशिष शेलारांचं सभागृहात बाळासाहेब थोरातांना आव्हान (व्हिडिओ)

Related Posts