IMPIMP

Jalgaon Crime | नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी, म्हणाले…

by nagesh
Jalgaon Crime | Police Inspector K.K. Patil apologizes to Warkari sect says

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइनJalgaon Crime | राज्यात भोंग्याचे प्रकरण (Azaan On Loudspeaker) गाजत असताना जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) चाळीसगाव (Chalisgaon city) येथे कीर्तन (Kirtan) सुरु असताना नारदाच्या गादीवर पोलीस अधिकाऱ्याने बुट घातलेले पाय ठेवून वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या होत्या. पोलीस निरीक्षक के. के. पाटील (Police Inspector KK Patil) यांच्या अशा वागण्यामुळे वारकरी संप्रदायाने (Warakari Sect) राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच पाटील यांचे निलंबन (Suspension) होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Agitation) करण्याचा इशारा वारकऱ्यांनी दिला होता. दरम्यान, सर्वच स्तरातून टीकेची झोड होत असताना पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी (Apologize) मागितली आहे. (Jalgaon Police)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरामध्ये कीर्तन सुरू असताना व्यासपीठावर नारदाच्या गादीवर पायातील बुटासह गेलेले शहर पोलीस स्थानकाचे (Chalisgaon City Police Station) निरीक्षक के. के. पाटील यांनी काल माफी मागितली आहे. चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग नगरात ह. भ. प. सोमनाथ महाराज जपे (Somnath Maharaj Jape) यांचे कीर्तन सुरू असताना गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी व्यासपीठावर चढून कीर्तनकाराच्या पायाखाली नारदाच्या गादीवर बुटाचे पाय ठेवले यावर सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. (Jalgaon Crime)

पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे स्पष्टीकरण

पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, काल रात्री लागत रोड परिसरात दहा – सव्वा दहाच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना हनुमानसिंग राजपूत नगर (Hanuman Singh Rajput Nagar) या भागातून लाऊडस्पिकरचा मोठमोठ्याने आवाज येत होता. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. तिथे सप्तश्रृंगी मातेच्या (Saptashrungi Temple) समोर कीर्तन सुरु होते. रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत लाऊड स्पिकरचा वापर करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्या आदेशाची नागरिकांना माहिती देण्यासाठी आम्ही वाहनातून उतरुन त्या कीर्तनातील माईक पर्यंत गेलो होतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तेव्हा आम्ही शासकीय वर्दी (Government Uniform) घातली होती. आमच्या पायात बुट होते. आम्ही त्या ठिकाणी जाऊन महाराजांना विनंती केली की, दहा वाजले आहेत. लाऊड स्पिकर बंद करा, अशी विनंती केली होती. त्या ठिकाणी गेलो तिथे माईक खाली एक गादी होती. तिला नारदाची गादी (Narad Gadi) म्हणतात. तिथे अनावधानाने आम्ही बुटासहीत त्या गादीपर्यंत गेलो. आम्हाला त्या गादीबाबत कोणतीही कल्पना नव्हीत. त्या गादीला महत्त्व आहे याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. अनावधानाने कर्तव्य बजावत असताना आमचे त्या गादीवर बुटासहित पाय पडले असतील. त्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी दिली.

Web Title :- Jalgaon Crime | Police Inspector K.K. Patil apologizes to Warkari sect says

हे देखील वाचा :

Pune Mumbai Expressway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यु !

CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | 50 हजाराच्या लाचप्रकरणी GST अधीक्षकासह निरीक्षकास अटक; कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये CBI ची कारवाई

Kidney Stone दूर करण्याचे सोपे उपाय, रोज प्या हे 3 प्रकारचे ज्यूस

Pune Aam Aadmi Party | टँकर माफियांचा पुणे शहराला विळखा ! पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको; पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या – AAP ची मागणी

Related Posts